ST Bus esakal
नांदेड

एसटीचे तीन हजारपैकी केवळ तीनशे कर्मचारी कामावर

नांदेड जिल्ह्यातील नऊ आगारांतील स्थिती, धावताहेत पंधराच बस

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मराठवाड्यात सर्वात मोठा असलेल्या नांदेड जिल्ह्यात एसटीची नऊ आगार आहेत. विभागाच्या हजेरीपटानुसार प्रशासकीय सेवा, कार्यशाळा, चालक - वाहक असे मिळून दोन हजार ९२४ कर्मचारी आहेत. मागील दोन महिन्यांपासून विभागातील ३१६ कर्मचारी प्रत्यक्ष कर्तव्यावर हजर आहेत. त्यांच्यावरच बस वाहतुकीचा भार आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. त्यामुळे एसटीवर विसंबून असलेल्या प्रवाशांचे हाल सुरु आहेत. सध्या विभागातून केवळ १५ ते १६ बस धावत आहेत. त्यामुळे महामंडळास आजही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. दोन हजार ९२४ पैकी दोन हजार ३५९ कर्मचारी अजूनही आंदोलनात आहेत. निलंबित करण्यात आलेल्या ५८ कर्मचाऱ्यांपैकी शासकीय सेवेतील एक तसेच एक चालक व तीन वाहक असे प्रत्यक्ष पाच कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. चालक-वाहक, शासकीय सेवेतील व कार्यशाळेतील असे ५७ कर्मचारी कामावर गैरहजर तर शासकीय सेवेतील ८३, कार्यशाळेतील ५८, चालक १७, वाहक २८ असे मिळून १८७ कर्मचारी हे साप्ताहिक सुटी, दौरा, अधिकृत रजेवर गेल्याची हजेरी पटावर नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

SCROLL FOR NEXT