Nanded News 
नांदेड

Video - मातृतीर्थ माहूरच्या कुंडातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण सर्वोत्तम 

प्रमोद चौधरी

नांदेड : गोदावरी नदी संसद" परिवारामार्फत नांदेड जिल्ह्यातील जलप्रदूषण तपासणी केमिकल किटद्वारे करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत माहूर येथील मातृतीर्थ, भानुतीर्थ, काशीकुंड, ऋणमोचन कुंड जलाशयातील पाण्याचे आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. मातृतीर्थ येथील पाण्यातील ऑक्सिजन हे 11.00 ppm आढळून आले. एवढ्या चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन हे केवळ हिमालयन नद्या, गंगा नदीच्या उगम क्षेत्रात आढळते.

पुरातन ग्रंथामध्ये मातृतीर्थ कुंडाची निर्मिती श्री रेणुकादेवी पुत्र श्री परशुराम भगवान यांनी केली आहे. तसेच हे कुंड म्हणजे गंगेचे तीर्थ समजल्या जाते. या प्रयोगामुळे मातृतीर्थ येथील जल हे अत्तीउच्च दर्जाचे आहे हे सिद्ध होते. तसेच भानुतीर्थ कुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण 10.5 ppm आढळून आले आहे. काशीकुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण 8.5 ppm आढळून आले आहे. तसेच ऋण मोचन कुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण 10.00 ppm आढळून आले आहे. 

2019 मध्ये श्री रेणुका देवी संस्थान, सूर्योदय फौंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, माहूर महाश्रमदान ग्रुप, जलस्वराज्य परिवार यांच्या सहकार्याने या कुंडातील शेकडो वर्षे साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्यात आला होता. हा गाळ काढण्यात आल्यामुळे या सर्व कुंडास नवसंजीवनी प्राप्त झाली आहे.

मातृतीर्थ परिसर विलोभनीय
2020 मध्ये श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने मातृतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कन्हव यांच्या मार्गदर्शनाखाली कामे पूर्ण करण्यात येत आहेत. मातृतीर्थ परिसर अत्यंत विलोभनीय दिसत आहे. 

डोळ्याचे पारणे फेडणारे कुंड
भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे मातृतीर्थक्षेत्रचे दर्शन भक्तगणाना सूर्योदय व सुर्यास्तास होत आहे. निलेश केदार गुरुजी व माहूर महाश्रमदान ग्रुप यांचे सहकार्य या कार्यास लाभत आहे. 

वैज्ञानिक उपाययोजना करण्यात येणार
भविष्यात पाणीप्रदूषण न होण्यासाठी गोदावरी नदी संसद मार्फत वैज्ञानिक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्वसमावेशक "गोदावरी नदी संसद" फेसबुक ग्रुप स्थापन करण्यात आला आहे असून शेकडो नांदेडकर या मोहिमेशी जुडले आहेत. सर्व नदी व कुंड प्रेमींनी या ग्रुपशी जुडावे असे आवान संयोजक दिपक मोरताळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT