परभणी कृषी विद्यापीठ sakal
नांदेड

परभणी कृषी विद्यापीठाची वाणनिर्मितीत भरारी

गतवर्षी साडेआठ हजार क्विंटल बियाणांची निर्मिती

​गणेश पांडे

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने बियाणे वाण निर्मितीत भरारी घेतली आहे. गतवर्षी विद्यापीठातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी साडेआठ हजार क्विंटल बियाणांची निर्मिती केली आहे. यंदा दहा हजार क्विंटलचे उद्दिष्ट विद्यापीठाने समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहेत.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी आतापर्यंत ज्वारी व कापूस या दोन मुख्य पिकांवर लक्ष केंद्रित केले होते. परंतु, अलीकडच्या काळात मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीनचा पेरा वाढविला आहे. आता सोयाबीन हे मुख्य पीक गृहित धरले जात आहे. हा बदल लक्षात घेऊन विद्यापीठाने सोयाबीन पिकांचे ११ वाण शेतकऱ्यांसाठी विकसित केले आहेत. त्यापैकी चार वाण प्रचलित झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या वाणांची चर्चा आंतरराज्यस्तरावर होऊ लागली आहे.

परभणीच्या कृषी विद्यापीठाने विविध पिकांचे १४४ वाणांची निर्मिती केली आहे. तूर, सोयाबीन पिकांचे अनेक चांगले वाण शेतकरी बांधवांत मोठ्या प्रमाणात प्रचलित झाले आहेत. राज्‍यातील एकूण तूर लागवड क्षेत्रापैकी पन्‍नास टक्के क्षेत्रावर विद्यापीठाचे बीडीएन ७११ हा वाण घेतले जाते. गेल्‍या वर्षी साडेआठ हजार क्विंटल बियाणे निर्मिती विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात आली असून, यावर्षी दहा हजार क्विंटल बीजोत्‍पादनाचे लक्ष आहे.

गेल्‍या तीन वर्षांच्‍या कार्यकाळात केवळ मुख्‍यालयी विद्यापीठनिर्मित दर्जेदार बियाणे विक्री न करता मराठवाड्यातील प्रत्‍येक जिल्‍ह्यातील शेतकरी बांधवांना विकेंद्रित विक्री व्‍यवस्‍था करून बियाणे उपलब्‍ध करण्‍यात आले आहेत. कोरोनाच्‍या परिस्थितीतही विद्यापीठाचे विस्‍तार कार्य कोठेही न थांबता ऑनलाइन पद्धतीने चालूच होते. या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्‍यात आली.

- डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

SCROLL FOR NEXT