Accident sakal
नांदेड

Accident: पार्डीत संरक्षक भिंत तोडून ट्रॅक घरात घुसल्याने तरुणी जागीच ठार

पार्डी अर्धापूर येथे देळूब बु.कडून पार्डी.कडे येणाऱ्या ट्रॅक सरंक्षक भिंत तोडून घरात घुसला

सकाळ डिजिटल टीम

अर्धापूर : पार्डी अर्धापूर येथे देळूब बु.कडून पार्डी.कडे येणाऱ्या ट्रॅक सरंक्षक भिंत तोडून घरात घुसला. यात एक तरुणी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. वर्षा माणिक मदने असे मयत तरुणीचे नाव असून ती उच्च शिक्षित आहे.या अपघाताच्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील पार्डी मुक्ता येथे (एम.एच.- २६ / बी.इ.- ९१९३) संरक्षण भिंत तोडून घरात देळूब रोड वरील घरात घुसल्याची घटना सकाळी झाली.. देळूब कडून येणारा भरधाव ट्रॅकने सर्वप्रथम त्यांनी दुचाकी ( एम.एच.- २६. बी.बी.- ७६३६) ला धडक दिली. या अपघातात दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

त्यांनतर ट्रॅक घरात घुसला तेंव्हा वर्षा मदने ही सकाळी मुख मार्जन करत होत्या. अचानक ट्रॅक घरात घुसला तेव्हा तरुणीला बचावाचा वेळच भेटला नाही. यात तरुणी ट्रॅकच्या खाली आली, यातच तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅक तरुणीला चिरडून घरात ठेवलेल्या दोन दुचाकीलाही धडक दिली. यात दुचाकी (एम.एच-२६, ए.झेड.- ३२०८ ),( एम .एच - २६- वाय-३४७९) या दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह पोलिसांनी भेट दिली आहे. तसेच चालक व त्यांच्या सहाय्यकाला ताब्यात पोलीसानी घेतले आहे.

वर्षा मदने होती उच्च शिक्षित

अर्धापुर तालुक्यातील पार्डी म.येथील घरात ट्रॅक घुसून उच्चशिक्षित तरुणी ठार झाल्याची घटना घडल्याने पार्डी गावात शोकावळा पसरली आहे. .वर्षा मदने ही अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांनी होती. ही पाचवी वर्गापासून बिलोली तालुक्यातील शंकर नगर येथील नवोदय विद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने बी. एस.सी.ला प्रवेश घेतला. शिक्षण घेत असताना लहान मुलांचे वर्गही घेत होती. तिने दोन दिवसांपूर्वी र् एका खाजगी पतसंस्थेत मुलाखत दिली होती. तर उद्या लेखी परीक्षासाठी बोलावले होते. अश्या होतकरू तरुणीचा अपघाती मृत्यू होणे आई वडीलांना धक्काच बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar : 'मराठी-कन्नड या दोन्ही भाषा माझ्यासाठी समान'; टीईटी परीक्षेबाबतही आमदार गोपीचंद पडळकरांचं महत्त्वाचं विधान

Gold Silver Price Drop : वर्षाचा शेवट गोड! सोने-चांदी दरात घसरण, नवीन वर्षात सोन्या चांदीचे भाव जाणून घ्या

Mumbai Rain: मुंबईत २०२६ ची सुरुवात आश्चर्याने! थंडीच्या काळात पावसाची एंट्री

Latest Marathi News Live Update : कृष्णेकाठी वसलेल्या साताऱ्यात आजपासून सारस्वतांचा मेळा भरणार

2026 मध्ये OTT वर धुमाकूळ घालायला येताय नव्या सीरिज, प्रेम, ड्रामा, थ्रिल आणि अ‍ॅक्शनने भरलेली ही यादी, एकदा नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT