Nanded News 
नांदेड

Video- नांदेड आगारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा 

प्रमोद चौधरी

नांदेड : पाच महिन्यांपासून थांबलेली एसटीची चाके सुरु व्हावीत म्हणून अटी व शर्तीनुसार शासनाने एसटीला प्रवाशी वाहतुकीसाठी परवानगी दिली. परंतु, कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता, किंवा निर्देशाला हरताळ फासला जात आहे. परिणामी प्रवाशांसह वाहक व चालकांच्याही आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी वाहतुक करण्याचे निर्देश देवून एसटी बसेस सुरु केल्या. थांबलेले अर्थचर्क पुन्हा सुरळीत सुरु व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. परंतू बसेसमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम पाळल्या जात नसून फिजिकल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र बसस्थानकावर बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे मास्क व सॅनीटायझरचा अजिबात वापर होत नसल्याने संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाल्याचे काही वाहक व प्रवाशांनी सांगितले. 

लॉकडाऊननंतर शासनाने एसटी बसेस सुरु करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्केनुसार प्रवाशांना सवलत देणे, तोंडावर मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणे या अटीवर बस सेवा सुरु करण्यात आली. परंतु नांदेड जिल्ह्यात शासनाच्या या निर्देशाचे पालन होत नसून एका सीटवर दोन ते तीन प्रवाशी बसून प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांच्या तोंडाला मास्क बांधल्याचे दिसून येत नाही. एवढेच नाही तर एसटी बसेसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध नसल्याने बसमध्ये गर्दी होवून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदेड आगार प्रवाशी तसेच चालक-वाहकांच्या जीवाशी खेळत असून मागील काही दिवसांपासून १०० टक्के प्रवाशी प्रवास करत आहेत. 

नांदेड आगारात पंधराच्यावर कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. परंतु, चालक वाहकासह इतर कर्मचाऱ्यांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यास वरिष्ठ अधिकारी पुढाकार घेत नसल्याने एसटी महामंडळात कोरोना बाधीत रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे असे एका वाहकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bogus Birth Certificates : मुंबई महापालिकेत ८७ हजारांहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रांचा आरोप

आता फक्त गरजेचाच माल आयात होणार! अनावश्यक विदेशी वस्तूंवर सरकार बंदी घालणार; व्यापार तूट कमी करण्यासाठी मास्टरप्लॅन

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार भाकरी फिरवणार, अजित दादांचे २२ आमदार गुप्त भेटले?; पटेल -तटकरेंनीही घेतली भेट

Latest Marathi News Live Update : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

VIDEO : देश आर्थिक संकटात असताना मोदी इटलीत जाऊन चॉकलेट वाटतायेत..राहुल गांधींचा हल्लाबोल, 'त्या' व्हिडीओवरून केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT