pistol and sword seized from two in nanded police action Sakal
नांदेड

Nanded News : नांदेड शहरात दोघांकडून गावठी पिस्तूल, तलवार जप्त

१४ मे रोजी दुपारी देगलूर नाका परिसरातील कापूस संशोधन केंद्राच्या गेटजवळ संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nanded News : इतवारा ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, एक तलवार आणि चाकू जप्त केला आहे. आवेस सय्यद खलील (वय २४) आणि शेख समीन ऊर्फ अरबाज शेख रौफ (वय २३) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते दोघेही नांदेडमधील रहिवासी आहेत.

पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशाने रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेऊन अवैध धंद्यांवर कारवाई करणे व संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याकरिता आदेशित केले होते. त्याप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार अर्जुन मुंडे, चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड,

हबीब चाऊस आणि श्रीराम दासरे यांनी १४ मे रोजी दुपारी देगलूर नाका परिसरातील कापूस संशोधन केंद्राच्या गेटजवळ वरील दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, एक तलवार आणि एक चाकू अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या दोघांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT