mp chikhalikar 
नांदेड

पी.एम. केअर फंडातुन नांदेडला दोन ऑक्सीजन प्लांट-खासदार चिखलीकर

पीएम केअर फंडातून गुरु गोविंदसिंघ शासकीय रुग्णालयात होत असलेल्या आॅक्सिजन प्लांटची पाहणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली. सोबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व इतर.

प्रमोद चौधरी

नांदेड : कोवीड- १९ च्या पार्श्वभूमीवर रुग्णांना ऑक्सीजनचा पुरवठा (Oxygen suplay) मुबलक करण्यासाठी नांदेडमध्ये दोन आॅक्सीजन प्लांट पी.एम.केअर फंडातून (Pm Care fund) मंजूर झाले असून त्यातील एका प्लांटचे कामही सुरु झाले आहे. त्यापैकी गुरुगोविंदसिंघ शासकीय रुग्णालयातील आॅक्सीजन प्लांट ३० मेपर्यंत तर डॉ. शंकरराव चव्हाण रुग्णालय विष्णुपुरी येथील प्लांट ३० जूनपर्यंत सुरु होईल, अशी माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Mp chikhalikar) यांनी सोमवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत दिली. (P.M.- Two- Oxygen- Plants- to- Nanded- from- Care- Fund-MP -Chikhlikar)

खासदार चिखलीकर म्हणाले की, केंद्रातर्फे १० मे रोजी पहिली आॅर्डर काढली. त्यात देशामध्ये ७२ प्लांटचा समावेश असून राज्यात नांदेड, पुणे, औरंगाबाद आणि जालना अशा चार प्लांटचा समावेश होता. तसेच २२ मे रोजीच्या आॅर्डरमध्ये देशात २०० प्लांट असून राज्यात १० प्लांटचा समावेश आहे. त्यात नांदेडचा समावेश असून विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये हा आॅक्सीजन प्लांट उभा राहणार आहे. गुरुगोविंदसिंघ शासकीय रुग्णालयातील प्लांटचे काम युद्ध पातळीवर सुरु असून सोमवारी मी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, नॅशनल हायवेचे अधिकरी सुनिल पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. यादवराव चव्हाण यांच्या सोबत पाहणी केली आहे. विष्णुपुरी येथे प्लांट उभारणीसाठीच्या जागेचीही पाहणी केल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.

हेही वाचा - बारड (तालुका मुदखेड) येथील युवकांनी जीवाची पर्वा न करता कॅनलमध्ये कारसह बुडणाऱ्या आई व चिमुकल्या दोन मुलांना सुखरुप बाहेर काढून जीवदान दिले.

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाची होतेय मदत

आॅक्सीजन प्लांटचे काम युध्द पातळीवर पुर्ण होण्यासाठी केंद्र सरकार विविध मंत्रालयाची मदत होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सिव्हील वर्कची जबाबदारी घेतली आहे. तर संरक्षण मंत्रालयाच्या सैनिकी हेलीकॉप्टरमधुन सदर प्लांटची मशीनरी नांदेड येथे आणण्याची जबाबदारी घेतली. महावितरनकडून विजपुरवठा केला जाणार आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने ‘डीआरडीओ’ची जाबबदारी स्विकारली आहे. एका प्लॉटची क्षमता एक हजार (LPM) लिटर प्रतिमिनिट असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT