file photo 
नांदेड

प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड: शहराच्या जुना गंज परिसरात पैलवान टी हाऊससमोर जुन्या वादातून एकावर सोमवारी (ता. सहा) जुलै रोजी केलेल्या प्राणघातक हल्ल्यातील मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ता. नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

सोमवारी (ता. सहा) रोजी दुपारच्या सुमारास पैलवान टी हाऊस समोरील एका औषधी दुकानांच्या पायऱ्यावर गोविंद इस्माईल कांबळे (वय २०) यास जबर मारहाण झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोविंद कांबळे याला मारेकऱ्यांनी तिथेच टाकून पळ काढला. यानंतर हे प्रकरण चांगलेच पेटले. तणाव निर्माण झाल्याने या भागात संतप्त नागरिकांनी दगडफेक करुन दहशत पसरविली. यावेळी काही वाहनांचेही व दकानांचे नुकसान करण्यात आले. जखमींना पोलिसांनी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळांवर बघ्यांची गर्दी 

घटनास्थळावरील वाढता तणाव व नातेवाईकांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता अतिरिक्त पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड, पोलीस उपाधीक्षक (इतवारा) धनंजय पाटील, इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्यासह आधी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीचा नातेवाईक अजय इस्माईल कांबळे याच्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाळु गीते यांच्याकडे देण्यात आला.

दगडफेक करणाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल

याच प्रकरणात दगडफेक करणाऱ्याविरुद्ध पोलिस कर्मचारी ज्ञानदेव चौरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात जमावाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे यांच्याकडे देण्यात आला. इतवारा पोलिसांनी मारहाण प्रकरणी शेख खान ऊर्फ पप्पू शेख मनाला, सय्यद मशीन सय्यद सुलतान, अब्दुल गफार अब्दुल खालिद आणि शेख मिया इलियास या चार जणांना पकडले. तसेच दगडफेक करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली. घटनास्थळी अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT