nanded
nanded nanded
नांदेड

नांदेडमध्ये आरोपीच्या दिशेने पोलिसांनी केला गोळीबार

अभय कुळकजाईकर

नांदेड: वजिराबाद पोलिस ठाण्याच्या पथकाने खून प्रकरणातील दोघांना अटक केली. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या दिशेने खंजर फेकून मारला. मात्र, पोलिसांनी नेम चुकवत त्यांच्या दिशेने आरोपीवर गोळीबार केला. यात एकजण जखमी झाला असून तो फरार झाला आहे. ही कारवाई माळटेकडी परिसरात मंगळवारी (ता. २७) दुपारी एकच्या सुमारास झाली. पकडलेल्या दोघांपैकी एकजण विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.

दरम्यान, घटनास्थळाला नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चिखलवाडी भागात ता. सात जुलै रोजी जमीर बेग या रिक्षा चालकाला मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मारेकऱ्यांचा शोध वजिराबादचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, फौजदार अब्दुल रब, फौजदार उत्तम वरवडे व त्यांचे सहकारी घेत होते.

मारेकऱ्यांची ओळख पटल्यानंतर तपासाला वेग मिळाला. जमीर बेगला मारणारा सोनुसिंग उर्फ सोनु भोंग राजेंद्रसिंग चव्हाण (वय २०, रा. भगतसिंघ रोड, नांदेड) आणि त्याच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक हा शहराच्या लक्ष्मीनगर भागात एका घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी सकाळी सोनु भोंगला शोधण्यासाठी वजिराबादचे पोलिस पथक लक्ष्मीनगर येथे एका घरात गेले होते. पण तेंव्हा पोलिसांना खंजीर दाखवून सोनु भोंग एका साथीदारासोबत पळून गेला. मात्र, त्याच्या सोबतच्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपी एका दुचाकीवरुन माळटेकडीकडे पळत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी पोलिसांवर त्यांनी खंजर फेकून मारला. मात्र, पोलिसांनी तो चुकवत पिस्तुलातून फायर केला. तो फायर एकाच्या पायाला लागला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला असून जखमी झालेला आरोपी मात्र पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी पोलिसांनी सोनुसिंग भोंगला अटक केली असून फरार आरोपीचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT