चिखल तुडवत रस्ता सरेना, अखेर त्यानं जीव सोडला

यावेळी १०८ क्रमांकाला फोन लाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावली खरी मात्र चिखला मुळे ती ही काही अंतरावर थांबली
parbhani
parbhaniparbhani

पाथरी (परभणी): तालुक्यातील वाघाळा शिवारातील पारधी वस्तीवरील एका तीस वर्षीय युवकाला चिखलमय रस्त्यातून उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना उशीर झाल्यामुळे जीव गमवावा लागण्याची घटना सोमवारी (ता. २६) सायंकाळी पाच वाजता घडली. पाथरी तालुक्यातील वाघाळा गावापासून दोन किमी अंतरावर पारधी समाजाची वस्ती आहे. पावसाळा सुरू झाला की या वसाहतीचा गावांशी संपर्क तुटतो, तो केवळ पक्का रस्ता नसल्याने. पक्का रस्ता नसल्याने या वस्ती वरील लोकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागते. यात काहींना जीवही गमवावा लागला आहे.

अशीच ह्रदयद्रावक घटना सोमवारी (ता. २६) रोजी घडली. येथे राहाणाऱ्या राजेभाऊ रामा पवार (वय ३०) या युवकाला दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक रक्ताची उलटी झाली. यावेळी वस्तीवर राहणाऱ्या युवकांनी आणि नातेवाईकांनी राजेभाऊ या युवकास उचलून घेत कॅनॉलकडून रस्त्यावर काही अंतर पायी चालत नेल्यानंतर मोटार सायकलवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यात गुडघाभर चिखल झालेला असल्याने मोटार सायकल चिखलात रुतून बसली. या नंतर आजारी युवकाला बैलगाडीतून दवाखान्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला.

parbhani
'डोळ्यादेखत पोटची लेकरं बुडाली, फोन करावं तर नेटवर्क काम करेना'

यावेळी १०८ क्रमांकाला फोन लाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावली खरी मात्र चिखला मुळे ती ही काही अंतरावर थांबली. वसाहत ते रुग्णवाहिकेपर्यंतचा प्रवास कधी पायी तर कधी बैलगाडीत करत या आजारी युवकाला रुग्णवाहिकेपर्यंत आणले. तेथून वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोचले. पारधी समाज वस्ती ते वाघाळा हे दोन अडीच किमीचे अंतर कापण्यासाठी तब्बल दीड तास लागला.

parbhani
प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणत विधवेला बेदम मारहाण

...तर तो वाचला असता
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी केली असता सदरील युवकाला उपचारासाठी आणायला दहा मिनिटे उशिर झाल्याचे सांगून मृत घोषीत केले. या वेळी येथे उपस्थित सर्वांची मने सुन्न झाली. हा प्रकार केवळ रस्त्याअभावी झाल्याची भावना सर्वांना वेदना देऊन गेली. ही घटना पहिलीच नसून या पुर्वी ही अनेक वेळा गरोदर महिला, वृद्ध,आजारी व्यक्ती यांना उपचारा साठी नेता न आल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com