file photo 
नांदेड

तामसा येथे पोलिसांच्या धाडीत १३ क्विंटल गोमांस जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा

शशिकांत धानोरकर

तामसा (जिल्हा नांदेड) : तामसा येथील वार्ड क्रमांक एकमधील अवैधरित्या चालू असलेल्या कत्तलखान्यात पोलिसांनी शनिवारी (ता. २३) सकाळी धाड टाकून साडेतेरा क्विंटल गोमांस जप्त केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. 

चिडलेल्या जमावानी काहीजणांना मारहाण केल्याने घटनास्थळावरुन गुरे गायब करण्यात आली आहेत. येथील कथित कत्तलखान्यात अवैधरित्या विनापरवानगी गोवंशाची हत्या करुन गोमांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी शनिवारी पहाटेच सापळा रचून संबंधित ठिकाणावर धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन दोन लक्ष ६२ हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त करुन तिघांना ताब्यात घेण्यात आले. अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी आरोपी शफी तकसीर खाटीक, निसार याकूब खाटीक, मोमीन मुसा खाटीक सर्व रा. तामसा यांना अवैधरित्या व विनापरवानगी गोवंशाची कत्तल करुन गोमांस विकण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेऊन कार्यवाही केली. यावेळी पोलिसांसमोरच जमलेल्या जमावाकडून काहीजणांना मारहाण झाल्यामुळे वातावरणात तणाव झाला. पोलिसांना देखील जमाव आक्रमक होण्याचा अंदाज नव्हता. कारवाईनंतर उद्भवणाऱ्या तनावाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळ परिसर व शहरातील अन्य ठिकाणी दिवसभर खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. गोमांस जप्त करण्याच्या घटनेनंतर एक ते दीड तासांनी जमाव होण्यास कारणीभूत असणाऱ्यांचा शोध घेऊन चिथावणीखोरांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवत शांतता राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मद्दे यांनी केले आहे. याप्रकरणी नामदेव मद्दे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : दादर येथील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT