file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात 16 तालुक्यातील एकूण एक हजार 309 ग्रामपंचायतींपैकी एक हजार 15 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार होते. यापैकी मुखेड तालुक्यातील जांब आणि कंधार तालुक्यातील आलेगाव या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली. जिल्ह्यात प्रत्यक्ष एक हजार 13 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली. यातील 907 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार (ता. 15 ) जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

1013 ग्रामपंचायतींपैकी पूर्णतः बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या 85 आहे. ग्रामपंचायतीच्या एकुण जागांपैकी काही जागेसाठी वैध नामनिर्देशनपत्र अप्राप्त असल्याने व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही अशा ग्रामपंचायतींची संख्या 21 तर प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या 907 एवढी आहे.

एकूण जागांची संख्या आठ हजार 617 एवढी असून एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 102 तर माघारीच्या तारखेनंतर एका जागेसाठी फक्त एकच वैध नामनिर्देशपत्र उरल्याने बिनविरोध निवडणूक झालेल्या जागांची संख्या एक हजार 653 तर प्रत्यक्ष जिल्ह्यात मतदान होणाऱ्या जागांची संख्या एकुण सहा हजार 862 आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयात माहे जानेवारीच्या दुसऱ्या मंगळवारी ता.12 जानेवारी रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.  
जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 12 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी दीड वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने द्यावीत. असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT