फोटो 
नांदेड

टपाल विभाग अंधाराची दृष्टी व अपंगांची काठी 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउ या संकटकाळी नांदेड टपाल विभागामधील महिला व पुरुष पोस्टमन हे दिनदुबळे, अनाथ, अंध दिव्यांगाची व गोरगरीबांसाठी पुढे आले. त्यांचा विकास होण्यासाठी त्यांच्या कोणत्याही बँकेतील अनुदानाचे पैसे Aeps मार्फत देण्यासाठी ऊन्हातान्हात तळमळीने आपल्या पत्र वाटपाच्या भागात बँक सेवा या तळागाळातील गरजू जनतेसाठी करीत आहेत. 

अंध व दिव्यांग काय ? त्यांना बँकेत जाता येत नाही. अंध व्यक्तीला जाण्यासाठी रस्ता दिसत नाही तर दिव्यांगाला चालता येत नाही. यांचा कोणी विचार केला किंवा नाही माहीत नाही पण नांदेडच्या मुख्य टपाल कार्यालयामधील पोस्टमन पदावर असलेली महिला पोस्टमन स्वाती गजेगे व पोस्टमन श्री. वडजे हे मात्र कर्मयोगी म्हणून अंधाराची दृष्टी व अपंगांची काठी बनले आहे.

पोस्ट बँकेच्या Aeps द्वारे सेवा

सोमवारी (ता. ११) पोस्टमन श्री. वडजे यांनी आपल्या पत्र वाटपाच्या भागात एक व्यक्ती दोन्ही पायाने अपंग व्हीलचेअर वाकर बसलेला अंदाजे वय वीस वर्षीय होता. पोस्टमनने त्याला विचारले की, भाऊ तुला बँकेतील अनुदान काढायचे का? यावेळी अपंग म्हणाला, हो तुम्ही माझी मदत कराल का ?
पोस्टमन यांनी अपंग मुलाचे आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक पोस्ट बँकेला जोडल्या बरोबर एक संदेश ओटीपी मोबाइलवर आला. तोच क्रमांक दुसऱ्यांदा पोस्ट बँकेला जोडला व पोस्ट बँकेच्या Aeps द्वारे काही मिनिटात बँकेतील रोख रक्कम काढून दिले.

महिला पोस्टमन पण आपल्या कर्तव्यात पूढे

सोमवारी (ता. ११) महिला पोस्टमन स्वाती गजेगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक अंध मुलगा रस्त्याच्या एका कडेने आपल्या ट्रायसिकल व्हीलचेअर ( चालण्या व फिरण्यासाठी सोयीस्कर जावे आधार काठी ) ने येत होता. महिला पोस्टमन यांनी आपले व अंध मुलाचे हात हँड वॉशने स्वच्छ धुतले आणि पोस्ट बँकेच्या मदतीने अपंगांचे जमा झालेले अनुदान त्यांनी आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांकवर रोख रक्कम काही सेकंदात काढून आधाराला दृष्टी देऊन आपले कर्तव्याचे पालन केले आहे.

डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांचे आवाहन

जिल्ह्यात डाक विभागाचे पोस्टमन हे डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत व पोस्टमास्तर डी. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पोस्टमन घरपोच पोस्ट बँकेच्या मार्फत कोणत्याही बँकेतील खात्यातील  पैसे Aeps द्वारे घरपोच काढून देत आहेत. नागरिकांनी बँकेत गर्दी न करता घरीच रहा, सुरक्षित रहा कुटूंबात रहा, आपली काळजी घ्या. असे आवाहन करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT