Dhanraj Bhorgir and vyankati bhorgir brothers sakal
नांदेड

Poultry Farming : कुक्कुटपालनातून भोरगीर बंधूंनी साधली प्रगती; वर्षाकाठी लाखोंची उलाढाल

योग्य नियोजन, पुरेसे मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात तन मन लावले की, विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा नीट बसवता येते.

सकाळ वृत्तसेवा

कुरूळा - योग्य नियोजन, पुरेसे मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात तन मन लावले की, विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा नीट बसवता येते. परंतु त्या शेतीपूरक व्यवसायाचे तंत्र मात्र अवगत असले पाहिजे, असे कुक्कुटपालन व्यवसायातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करणारे भोरगीर बंधू सांगतात. निव्वळ शेतीवरच अवलंबून न राहता पूरक व्यवसाय केल्यास आर्थिक प्रगती साधता येते याचे उत्तम उदाहरण हे भोरगीर बंधू आहेत.

कंधार तालुक्यातील टोकाचे गाव हासूळ जिथून अहमदपूर तालुक्याची सीमा सुरू होते. जवळपास तीन हजार लोकवस्तीचे गाव. या गावात सर्वाधिक कुक्कुटपालन व्यवसाय करणारे शेतकरी पाहायला मिळतात. मात्र, या व्यवसायात जिद्द, चिकाटी आणि कामातील सातत्य यामुळे हासूळ येथील धनराज रामराव भोरगीर व व्यंकटी रामराव भोरगीर या दोन बंधूंनी आर्थिक प्रगती साधली आहे.

त्यांच्याकडे एकूण तेरा हजार बॉयलर कोंबड्या असून योग्य नियोजनाअंती वर्षाकाठी एक कोटी रुपयांचा टर्नओव्हर या व्यवसायातून होतो. त्यांना आवश्यक असणारी पिल्ले कर्नाटकमधून आणली जातात. कोंबड्यांना आवश्यक असणारे खाद्य ते कच्चा माल घेऊन स्वतः तयार करत असून त्यात सोया डीओसी आणि मका याचा वापर केला जातो.

एक पक्षी परिपक्व होण्याच्या कालावधीत दिवसाला साधारणतः २०० ग्रॅम खाद्य खात असून ४५ दिवसांनंतर तो विक्रीयोग्य होतो. अशा विक्रीसाठी वर्षभरातून सहा बॅच बाहेर पडत असून एका बॅचमध्ये साधारणतः ३२ टन कोंबडी विक्री होत असल्याचे भोरगीर बंधूनी सांगितले. पक्ष्यांना रोगराई प्रतिबंध करण्यासाठी योग्य वेळी लसीकरण करण्यात येते.

शेतीसाठी खतनिर्मिती

सेंद्रिय खतात कोंबडी खताला विशेष दर्जा असून वर्षाकाठी ६० ते ७० ट्रॉली खत स्वतःच्या शेतीसाठी उपलब्ध होतो.भोरगीर यांच्याकडे स्वमालकीची चाळीस एकर जमीन असून यातील जवळपास २३ एकर जमीन त्यांनी या व्यवसायातून खरेदी केली असल्याचे सांगितले आहे.

मागील बारा वर्षांपासून या व्यवसायामुळे सेंद्रिय शेतीकडे कल वाढल्याचे भोरगीर बंधूनी सांगितले आहे. वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत असून कृषी पर्यवेक्षक रघुनाथ नाईक यांनी अनेकवेळा प्रत्यक्ष भेट देऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.त्यामुळे व्यवसायातील अनेक बारकावे समजत असल्याचे भोरगीर बंधूनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT