nanded news 
नांदेड

Video - कोरोनाच्या संकटातही पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : ज्येष्ठ महिन्यात येणारी वटपौर्णिमा शुक्रवारी (ता.पाच जून) शहर व परिसरात साजरी करण्यात आली. यंदा या सणावर कोरोनाचे संकट असतानाही विवाहीत महिलांनी सकाळ पासूनच पारंपारिक पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली. तसेच झाडा सात फेऱ्या घालून पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायूष्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना केली.

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी  विशेष म्हणजे वटपौर्णिमा आणि पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. विवाहित महिला ‘जन्मो जन्मी हाच पती मिळावा’, ‘पतीच्या दीर्घायुष्यासाठी’ व्रत करतात. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून पूजा करतात. एकमेकची वटी भरतात. काही जणी वटी भरताना वाण म्हणून वडाचे रोपटे देवून पर्यावरण जनजागृतीही करतात. परंतु, याचे प्रमाण खूपच कमी आहे. ते वाढण्यासाठी महिलांनी आता एकजूट करण्याची वेळ आहे.

यंदा दुहेरी योग
यावर्षी वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिन दोन्हीही एकाच दिवशी आले आहे. त्यामुळे शहरासह परिसरातील काही महिलांनी पर्यावरणाच्या सान्निध्यात, निसर्गाच्या साक्षीने वटपौर्णिमेच्या व्रताची पुजा केली. वडाच्या झाडाला पांढरा धागा गुंडाळून सात फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. काहींनी घरीच कुंडीमध्ये वडाचे रोप लावून सामुहिक पूजन केले. विशेष म्हणजे कोरोनाचे सावट असतानाही महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला.  

दीर्घायुषी वृक्षाचे व्हावे जतन
निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. त्यात आज पर्यावरण दिन देखील असल्याने दुहेरी योग जुळून आला आहे.

वडाच्या झाडाचं महत्व
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. वडाचं झाड गर्द सावली देखील देतं. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT