NND20KJP02.jpg 
नांदेड

नांदेडला प्रतिष्ठेचा ‘डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्स स्कोच अवार्ड’....कशाबद्दल ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कर्करोगासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासंदर्भात राबविलेल्या मोहिमेला अखिल भारतीय पातळीवरील ‘डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्स स्कोच अर्वाड’ देवून गौरव केला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या टिमने मिळविलेल्या या यशाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही मोहिम यशस्वी करणाऱ्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

पंचवीस लाख लोकांची केली तपासणी
कर्करोग आजारासंदर्भात लोकांनी निसंकोचपणे आजाराची लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करुन घ्यावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील बाराशे खेड्यांमध्ये दिड हजार आशा कार्यकर्ती यांना विशेष प्रशिक्षण दिले गेले. याचबरोबर रॅली व इतर उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास २५ लाख लोकांना स्क्रीनिंगच्या कार्यकक्षेत घेता आले. यात सुमारे १२ हजार लोकांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून आल्याने त्यांना वेळेवरच योग्य उपचारासाठी पाठविण्यात आले. वेळीच त्यांना उपचार मिळाल्याने पुढील संभाव्य आजाराच्या संकटापासून त्यांना वाचविता आले. 

नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत राबविली मोहिम 
संपूर्ण नांदेड जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ही मोहिम राबविली गेली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण जिल्हाभर राबविल्या गेलेल्या या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवर गुड गव्हर्नन्ससाठी मान्यता प्राप्त असलेल्या स्कोच अर्वाडसाठी नामांकन दाखल केले होते. यानंतर सदर संस्थेने अखिल भारतीय पातळीवरील नवीन दिल्ली येथे जानेवारी महिन्यात परिषद घेऊन प्रत्येक नामांकन सादर करणाऱ्या जिल्हा प्रमुखांना सादरीकरण करण्यास सांगितले होते. 

राष्ट्रीय पातळीवरील डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड
नवी दिल्ली येथे जिल्ह्याचे सादरीकरण निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी करुन संपूर्ण जिल्ह्याचा सप्रमाण आराखडा ठेवला होता. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेच्या माहितीने सारे सभागृह भारावून गेले होते. निवड समितीनेही याची दखल घेत नांदेड जिल्ह्याला अखिल भारतीय पातळीवरील हा डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव केला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

जिल्ह्याच्या टिमने केले अथक परिश्रम
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अशोक काकडे, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, बार्शी येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. नंदकुमार पानसे, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व जिल्हा परिषदेतील संबंधीत यंत्रणेने यासाठी पुढाकार घेतला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT