File photo 
नांदेड

नांदेडमध्ये नवीन घराच्या बांधकामाला महागाईचे ग्रहण 

प्रमोद चौधरी

नांदेड : राहायला सर्वसुविधायुक्त घर असावे, फिरायला कार असावी अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, सध्या नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने अनेकांचे नवीन घराचे स्वप्न आजच्या घडीला महागाईच्या विळख्यात सापडले आहे. 

आधीच बांधकामाचे साहित्याचे वाढलेले भाव आता त्यात इंधन दरवाढीची भर पडली आहे. कारण इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च पण वाढला आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्याने पर्यायाने बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली. वाढत्या दराने बांधकाम व्यावसायींकावर मंदीचे ढग कोसळले आहे. 

इंधन दरवाढीने सर्व क्षेत्रात महागाईने डोके वर काढले आहे. मुद्रांक शुल्क कमी केलेले असले तरी बांधकाम साहित्याच्या दरावर मर्यादा आणण्यासाठी इंधनाचे दर देखील आटोक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. दिवाळीनंतर बांधकाम साहित्याचे दर नेहमी वाढतात. बहुतांश लोक दिवाळीनंतर घराच्या बांधकामाला सुरुवात करतात. याचे मुख्य कारण बांधकामासाठी लागणारे मुख्यत्वेकरून पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. गवंडीसुद्धा काम करण्यासाठी उपलब्ध होतात. यंदा मात्र बांधकाम साहित्याचे वाढ वाढण्याची अनेक कारणे ठरली आहेत. अवकाळी पावसामुळे वीटभट्टीतील विटा फुटल्यात, यामुळे भाजलेल्या (पक्का) विटांची कमतरता भासू लागली आहे. विटांच्या गुणवत्तेवर देखील प्रतिकूल परिणाम झाला आहे. सिमेंट, लोखंड दर देखील वाढत आहे. वाळूमिळते तीही अव्वाच्या सव्वा भाव देवून खरेदी करावी लागत आहे. 

घर कामाचे साहित्य दर 
वाळू सहा हजार ते सात हजार रुपये ब्रास 
गिट्टी २३०० ते २४०० रुपये ब्रास
विटा २७०० रुपये हजार विटा 
लोखंड ४४०० रुपये क्विंटल
सिमेंट ३४० रुपये बॅग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT