file photo
file photo 
नांदेड

नांदेड : भाव गडगडले आणि कोबी- टोमॅटोच्या शेतात सोडले गुरे; शेतकऱ्यांनी घेतला धक्कादायक निर्णय

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ता. 25 मार्चपासून जिल्ह्यात टाळेबंदी करण्यात आल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडले. सध्या कोबी दोन रुपये किलो तर टोमॅटोला कोणी विचारत नसल्याने भाजीपाल्याचे उत्पन्न तर सोडा काढणीचा व लागवडीचा खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे शेतात आपली जनावरे सोडली.

थोड्याफार क्षेत्रात भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बहुतांश शेतकरी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात आहेत. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लाॅकडाऊन करण्यात आले असल्याने भाजीपाला कुणी खरेदी करत नाहीत. त्यामुळे शातात आळेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता येथील शेतकरी पांडुरंग तरोडेकर यांनी २० गुंठे पत्ता कोबी, २० गुंठे टोमॅटो आणि २० गुंठे कोथिंबीरची लागवड केली होती. ही पिके काढणीला आली असून अचानक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे व्यापारी खरेदीसाठी फिरकले नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकात जनावरे सोडून दिली. पत्ता कोबीला दोन रुपये, टोमॅटोला कोणी विचारत नसल्याने काढणीचा खर्च निघत नाही तसेच तोडण्यासाठी मजुरी लागते ते ५० टक्के सुद्धा निघत नाही. त्यात केलेला खर्च त्यामुळे हताश झालेल्या पांडुरंग तरोडेकर या शेतकऱ्यांसह अधिक शेतकऱ्यांनी गोबी पिकात आपली जनावरे सोडून संताप व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT