file photo 
नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेमधील या दोन अधिकाऱ्यांची अडचण वाढणार; काय आहे भानगड वाचा ?

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे आजी- माजी जिल्हा आरोग्य अधिकारी चांगलेच गोत्यात आले आहेत. परस्पर वेतन निश्चिती करुन आर्थिक अपहार केल्याची तक्रार विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या विरोधात प्राप्त झाली आहे. त्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी उद्या बुधवारी ( ता. 24) फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवून घेण्यासाठी तक्रारदार अॅड. प्रमोद नरवाडे यांना बोलावले आहे. यामुळे या दोन्ही मोठ्या अधिकाऱ्यांची अडचण नक्कीच वाढणार असल्याचे बोलल्या जात आहे.

दीड कोटी रुपयांचा अपहार प्रकरणात माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने यांच्यावर गुन्हे दाखल न करता उलट त्यांना निलंबनातून पुनर्स्थापित करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यापूर्वीसुद्धा नांदेड जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत होते. त्यांनी या पदाचा अतिरिक्त कार्यभार असताना ता. 9 जून 2011 ते 21 जून 2011 या कालावधीत स्वतःच्या अस्थाई कालावधीची स्वतः च्या स्वाक्षरीने वेतन निश्चिती करुन नियमबाह्य लाभ घेतल्याची तक्रार अॅड. प्रमोद नरवाडे यांनी केलेली आहे.

राज्य शासनाने तक्रारीची दखल घेऊन बीड येथील जिल्हा रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राजदीप कुलकर्णी यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले आहे. त्या अनुषंगाने तक्रारदार अॅड. नरवाडे यांचा ता. 24 फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवून घेण्यात येणार आहे. आवश्यक त्या कागदपत्रांसह जबाबात बालाजी शिंदे हे गोत्यात येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात दीड कोटी रुपयांचा अपहार झालेल्या प्रकरणात तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने व इतर काही निलंबित केले गेले होते परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता त्यांना सोडून दिले. या प्रकरणाची चौकशई विविध विभातील तीन सदस्य चौकशई करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Kolhapur Wildlife Attack : अवघ्या सव्वा वर्षांच बाळ वडिलांच्या कुशीत शांत झोपलं अन् कोल्ह्याने बरोबर हेरलं; कोल्हापूरच्या चंदगडमध्ये घडलं भयानक

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

SCROLL FOR NEXT