file photo 
नांदेड

बेटी बचावचा संदेश देत नवरीची गावातून मिरवणुक; अर्धापूरात चर्चा

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : आपल्या पाल्याचा विवाह सोहळा भव्यदिव्य करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. तसेच जरा हटके व आठवणीत कसा राहिल यासाठी विविध शक्कल लढविली जाते. विवाह म्हंटले की मिरवणुक आलीच. पण ही मिरवणुक नवरदेवाची असते. सहसा नवरीची मिरवणुक काढण्यात येत नाही. पण याला अपवाद जिल्ह्यातील अर्धापूर शहर ठरले आहे. शहरातील फुले नगरातील स्वतंत्र सैनिक कुटुंबातील डाके परिवाराने आपल्या नवरीची मिरवणुक काढली तीही घोड्यावरुन. शहरातील प्रमुख रस्त्यावरुन सवाद्य मिरवणुक काढून मुलगा- मुलगी समान असते याचा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आल्याने डाके कुटुंबाचे कौतुक होत आहे. तसेच बेटी बचाव बेटी पढाव या अभियानात चालना मिळाली आहे.

विवाह सोहळ्यात नवरदेवाची मिरवणुक ही अविभाज्य घटक. ही मिरवणुक आगळी- वेगळी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. मिरवणुकीत घोडा, उघडी जीप, पालखी, तुतारी, भालादार, चौपदार याचा सोबत डीजे, आधुनिक तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. अतिषबाजी केली जाते. पण हा सर्व आटापिटा नवरदेवाच्या मिरवणुकीसाठी. नवरीची मिरवणुक सभागृहात पालखीतून काढण्यात येते. याला अर्धापूर शहरातील डाके कुटूंब अपवाद ठरले आहे.

शहरातील फुलेनगरात बबन डाके राहतात. त्यांचे वडील नागोजी डाके हे स्वतंत्र सैनिक होते. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग नोंदविला होता.त्यांची नात श्रुतिका हिचा विवाह सागर जहिरव यांच्याशी गुरुवारी (ता. सात ) होणार आहे. लग्नाच्या पुर्वसंध्येला बुधवारी (ता. सहा ) सायंकाळी वधू- वराची मिरवणुक काढण्यात आली.

अर्धापूर शहरांत कुतूहल व कौतुकचा विषय

मारोती डाके यांचे जुने घर शहरातील जुन्या वस्तीतील रामनगर भागात आहे. या जुन्या घराच्या आठवणीला उजाळा मिळावा यासाठी वधू श्रुतिका व वर सागर अहिर यांची मिरवणुक रामनगर, मारुती मंदिर या मार्गांनी फुलेनगरातील नवीन घरी गेली व सांगता करण्यात आली. ही मिरवणुक अर्धापूर शहरांत कुतूहल व कौतुकचा विषय ठरला आहे. अशा प्रकारची नवरीची मिरवणुक प्रथमच काढण्यात आली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ancient Temple Mystery : खोदकाम सुरू असताना अचानक बाहेर आले प्राचीन मूर्तींचे अवशेष; ऋषिकेशच्या 'या' मंदिराचा विस्मयकारक इतिहास समोर, मूर्ती नेमकी कोणाची?

आधी हिंदू मुलीशी लग्न, धर्मांतर करुन युट्यूबर म्हणतो, 'पुरुषांची नजर मला माहिती, बुरखा घालणं गरजेचं'

Latest Marathi News Live Update : मुंबईतील चारकोपमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी रांगा

Gudi Padwa Decoration 2026: गुढी पाडव्याला ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा, घरात कधीच भासणार नाही कोणतीही कमतरता

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

SCROLL FOR NEXT