वाई बाजार (जिल्हा नांदेड) : लसीकरणाचा टक्का वाढल्याने (Vaccination) अनेक देशांमध्ये कोरोना संपुष्टात आलेला आहे. त्यांना मास्क वापरण्याची गरज पडत नाही. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर (Corona Third wave) आता ग्रामस्तरावर अधिकाधिक लसीकरण करुन घेणे व सोबतच कोरोना चाचण्या वाढवणे गरजेचे असून सध्या पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरणाचा प्रचार निवडणुकीच्या प्रचाराप्रमाणे (Election campaign) करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले आहे. (Promote- vaccination- as- per- election- campaign- Samadhan -Jadhav)
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर वाई बाजार जिल्हा परिषद गटासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना झूम मीटिंगद्वारे संबोधित केले. यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, गाव पातळीवरील प्रमुख कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व तसेच उपकेंद्रावरील लसीकरण केंद्राला भेटी देऊन योग्य नियोजन करून जास्तीत जास्त लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन लसीकरण करण्यावर भर द्यावे. लसीकरण संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.संभाव्य तिसर्या लाटेत आरोग्य यंत्रणा, शासन- प्रशासनाला ग्रामीण भागातून सहकार्याची मोठी गरज पडणार आहे.त्याची पूर्वतयारी आपण आतापासूनच करायला पाहिजे.
लसीकरण व कोरोना तपासण्या करुन घेण्याच्या बाबतीत लोकांमध्ये जागरुकता वाढण्यासाठी ज्याप्रमाणे निवडणूक काळामध्ये घरोघरी जाऊन गावातील राजकीय पक्षाचे नेते मतदान मागतात त्याचप्रमाणे आता घरोघरी जाऊन लोकांना लस घेण्याचे व तपासणी करुन घेण्याचे फायदे समजावून सांगावे. जेणेकरुन लोकं लसीकरण व तपासण्या करुन घेण्यासाठी प्रतिसाद देतील आणि निश्चितपणे जर लसीकरणाचा टक्का वाढला तर येणाऱ्या संभाव्य लाटेला आपण समर्थपणे परतवून लावू शकू. यासाठी कार्यकर्त्यांनी आता झटून कामाला लागण्याचे आवाहन समाधान जाधव यांनी आयोजित केलेल्या झूम मीटिंगमध्ये केले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.