file photo 
नांदेड

११७ कोटी रुपयांचे दोन लाख ३२ हजार क्विंटल धान्य खरेदी....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : किमान आधारभूत किंमत योजनेनुसार जिल्ह्यात सोळा ठिकाणी तूर व हरभरा खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रांवर १९ हजार ४६९ शेतकऱ्यांची दोन लाख ३२ हजार २१६ क्विंटल धान्य खरेदी झाली आहे. सध्या तूर खरेदीची मुदत संपली आहे. शेतकऱ्यांकडे हरभरा शिल्लक असल्यामुळे खरेदी केंद्र सुरु ठेवण्याची मागणी होत आहे. आजपर्यंत या धान्याचे ११७ कोटी १९ लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली.

सोळा ठिकाणी धान्य खरेदी 
शेतीमालाचे दरात घसरण झाल्यामुळे शासनाने खरेदीमध्ये हस्तक्षेप करून केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार तूर, हरभरा, सोयाबीन खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात १६ ठिकाणी धान्य खरेदी केंद्र सुरू झाले. यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नांदेड, मुखेड, किनवट, हदगाव व देगलूर या सहा ठिकाणी तूर व हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले. 

११७ कोटींचे धान्य खरेदी
महाराष्ट्र फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून (महा एसएससी) जिल्ह्यातील धानोरा (ता. धर्माबाद), करडखेड (ता. देगलूर), बरबडा (ता. नायगाव), डोणगाव (ता. बिलोली), नारनाळी (ता. कंधार), मांडवा (ता. किनवट) व धानोरा मक्ता (ता. लोहा) या ठिकाणी हरभरा खरेदी सुरू आहे. या १६ खरेदी केंद्रांवर आजपर्यंत १० हजार ९७३ शेतकऱ्यांचा एक लाख ८९ हजार हजार ३५१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. तर आठ हजार ४९० शेतकऱ्यांची ४२ हजार ८६५ क्विंटल तूर असे एकूण दोन लाख ३२ हजार २१६ क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले. या खरेदीपोटी ११७ कोटी १९ लाख ४२ हजार १२५ रुपयाचे चुकारे देण्याचे काम सुरू असल्याची माहिती श्री. फडणीस यांनी दिली. 

हेही वाचलेच पाहिजे.....शेतशिवारांनी नेसला हिरवा शालु

तुरीची मुदत संपली
जिल्ह्यात पंधरा खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात आली. या खरेदीसाठी ता. एक जानेवारी व ता. १५ जानेवारी ऑनलाइन नोंदणी सुरु झाली. या काळात १६ हजार ५३५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी आठ हजार ४९० शेतकऱ्यांची ४२ हजार ८६५ क्विंटल तूर ता. १४ तून पर्यंत खरेदी झाली आहे. सध्या शेतकऱ्यांकडील तूर संपल्यामुळे खरेदी बंद झाली.

हरभरा खरेदीला मुदतवाढीची प्रतिक्षा
जिल्ह्यात १६ ठिकाणी हरभरा खरेदी सुरु करण्यात आली. यासाठी २९ हजार ६३२ शेतकऱ्यांनी ता. १५ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान नोंदणी केली. या पैकी १० हजार ९७३ शेतकऱ्यांचा एक लाख ८९ हजार ३५९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. या हरभऱ्याचे ९२ कोटी ३१ लाख २५ हजार रुपये शेतकऱ्यांना वितरीत करणे सुरु आहे. दरम्यान हरभरा खेरदीची मुदत मंगळवारी (ता. १६) संपत आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांचा हरभरा शिल्लक असल्यामुळे खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. राज्य शासनाकडून केंद्राकडे मुदतवाढीची मागणी केल्याची माहिती जिल्हा पणन कार्यालयाकडून मिळाली.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT