file photo 
नांदेड

स्वत: च्या लग्नपत्रिका वाटप करणाऱ्या नवरदेवावर काळाचा घाला; नांदेड- बारड रस्त्यावर अपघातात ठार 

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : विवाह ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची व अविस्मरणीय घटना. यासाठी आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आगृहाचे निमंत्रण दिले जाते. आजही ग्रामीण भागात घरी जाऊन पत्रिका देवून निमंत्रण देण्यात येते. आपल्या विवाहाचे निमंत्रण घेऊन जाणा-या नवरदेवाचा दुचाकीला अपघात होवून त्यात नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड- बारड रस्त्यावरील निर्मल जिनिंग फॅक्टरीजवळ गुरुवारी (ता. एक ) रात्री झाली आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा बुधवारी (ता. सात) विवाह होणार होता. आपल्या भावी वैवाहिक आयुष्याचे स्वप्न पाहणा-या तरुणाचा बोहल्यावर चढण्याआधीच अर्ध्यावर डाव नियतीने मोडला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती आशी की. उत्तम भुजंगराव शिराने (वय 25) रा. टाकराळा ता. हिमायतनगर हे आपल्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून नांदेडकडून भोकरफाटा मार्गे बारडकडे जात आसतांना निर्मला काॅटन जिनींग मिलजवळ दुचाकीवरून (एम एच 26 बी यु 8473) जात असतांना अज्ञात वाहन चालकाने सदरील दुचाकीला मागून धडक दिली. यात उत्तम शिराने हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील अपघात गुरुवारी रात्री झाला आहे.

या अपघाताप्रकरणी मयताचे वडील भुजंगराव शिराने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा विवाह बुधवारी (ता. सात) औद्योगिक वसाहत नांदेड येथे सकाळी साडेअकरा वाजता होणार होता. ते आपल्या विवाहाच्या निमंत्रण पत्रिका वाटप करुन परत जात आसतांना ही दुर्दैवी घटना झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT