barad.jpg 
नांदेड

फुलांच्या वर्षावाने काेरोनामुक्त रुग्णास सुटी

प्रताप देशमुख


बारड, (ता.मुदखेड, जि. नांदेड) ः बारड (ता. मुदखेड) कोरोना केअर सेंटरअंतर्गत पहिला पाॅझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्णास तसेच विलगीकरण कक्षातील संशयित बारा क्वारंटाइनला दहा दिवसांच्या आरोग्यसेवा उपचार वैद्यकीय तपासणी अहवालानंतर कोरोनामुक्तीचा सुटी मिळाली आहे. ग्रामपंचायतने कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांचे फुलांच्या वर्षावाने जल्लोषात स्वागत केले असून आराेग्य प्रशासनाच्या तत्पर कोरोना सेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

आरोग्य विभागाच्या आदेशानुसार सुटी

मुंबईहून गावाकडे परतणाऱ्या मजूर कुटुंबांतील लोकांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता स्लॅब नमुने चाचणीत दोघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील बारा जणांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते. कोरोना केअर सेंटरअंतर्गत सर्व रुग्णांवर शासनाच्या आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार दहा दिवस उपचार करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णास व्हेंटिलेटर आॅक्सिजनची आवश्‍यकता भासली नसल्यास तसेच कालावधी संपल्यानंतर वैद्यकीय तपासणीत लक्षणे आढळून आली नसल्यास शासनाच्या गाईडलाईन्स आरोग्य विभागाच्या आदेशानुसार सुटी देण्यात आली असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. किशोर कदम यांनी सांगितले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक नितीन खांडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी विलास देशमुख, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य किशोर देशमुख, पोलिस पाटील यशवंतराव लोमटे यांच्या हस्ते कोरोनामुक्ती यौद्धांचे फुलांचा वर्षाव करून जल्लोषात स्वागत केले आहे.


आराेग्य प्रशासनानी कोरोना केअर सेंटरअंतर्गत उपचार सेवेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले होते. ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या त्तपर सेवेचे विशेष आभार मानले आहेत. काेरोनाबाधित रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष तसेच विशेष काळजी घेण्यात आली. पोलिस प्रशासनानी संपर्क साखळी तोडण्यासाठी दोन दिवसांचा जनता कर्फ्यू प्रभाविपणे राबविल्याने ग्रामपंचायतीने आभार मानले आहेत. काेरोना गो मोहिमेसाठी ग्रामविस्तार अधिकारी अनुप श्रीवास्तव, तलाठी अंजली बार्शीकर यांच्यासह कोरोनामुक्ती पथकाने नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT