file photo 
नांदेड

डिजिटल सुविधेमुळे रेडिओ अजूनही सदाबहारच

प्रमोद चौधरी

नांदेड ः मनोरंजनासाठी भरपूर साधने व माध्यमे आलीत मात्र, त्यातही रेडिओ आजही बाजी मारत असून, पूर्वीच्या रेडीओचे स्वरूप आता बदलले आहे. डिजिटल सुविधेमुळे त्याचे चाहते कायम असून रेडिओ आजही सदाबहारच आहे.


मनोरंजनाचे विविध माध्यमे व साधने आली आहेत व येत आहेत. पण सर्वसाधारण व गरीबासाठी मनोरंजनाचे साधन आजही रेडिओच आहे. छोटे छोटे व्यावसायिक त्यांच्या कामाला गती येण्यासाठी दिवसभर रेडिओ सुरू ठेवतात व मनोरंजन करवून घेतात. पूर्वी रेडिओ हा विशिष्ट पद्धतीचा व आकाराचा असायचा. मात्र, आता त्याचे स्वरूप छोटे व सर्वसामान्यांना परवडेल असे झाले आहे. प्रत्येकाकडे असलेल्या मोबाईलवर सुद्धा अनेकजण रेडिओ ऐकताना दिसतात. खरं पाहता संगीत आणि माहिती याचे मिश्रण म्हणजे रेडिओ होय.


छोट्या व्यावसायिकांना कामामुळे दिवसभर येणारी मरगळ घालवण्यासाठी रेडिओ वरील संगीत हे प्रभावी साधन ठरते. कोरोना काळात टीव्हीवरील कार्यक्रमाच्या शूटिंग बंद होत्या. त्यावेळी जुने कार्यक्रम जे चांगल्या प्रकारे प्रचलित होते ते पुन्हा दाखवण्यात आलेत. मात्र या काळातही रेडिओचे कार्यक्रम मात्र जनजागृतीसह सुरू होते. लॉकडाउन काळात सर्वच बंद असताना रेडिओने घरी बसलेल्यांना मनोरंजनाचा मोठा हातभार दिला.
कित्येक वर्षापासून चढ-उतारात चालत असलेल्या आकाशवाणीने लॉकडाउन काळात श्रोत्यांना मनमुराद मनोरंजन मिळवून दिले. रेडिओ हा सर्वसामान्यांचा खरा मित्र असल्याचे सिद्ध केले.

आजही रेडिओ, आकाशवाणी सदाबहार असून डिजिटल युगात श्रोते त्याचा आनंद घेताना दिसतात. आता ‘एफएम’ या सूमधूर व सूस्पष्ट वाहिनीद्वारे श्रोत्यांचे भरपूर मनोरंजन केले जाते. नव्या-जुन्या हिंदी मराठी गाण्यांची मेजवानी, भक्ती संगीत, बातम्या, शेती विषयक माहिती, विविध मुलाखती, आरोग्य विषयी माहिती, ज्ञान आदी विषय हाताळताना रेडिओचा जलवा अद्यापही कायमच आहे. एकंदरीतच सध्याच्या या धावपळीच्या युगात रेडिओचे स्थान अद्यापही उच्च व महत्त्वाचे असून, आजही तो सदाबहारच आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT