लोहा तालुक्यातील जोमेगाव शिवारात पेरणी सुरु 
नांदेड

दीर्घ प्रतिक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात पाऊस; पेरण्यांना सुरवात : सरासरी १९. ४ मिलिमीटर

रविवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस झाल्यामुळे जोमेगाव (ता. लोहा) शिवारात रखडलेल्या पेरणींची कामे पुन्हा सुरु झाली आहेत.

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिप पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली होती. काही भागात दुबार पेरणींचे संकट असतांना रविवारी (ता. २७) जिल्ह्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. सोमवारी (ता. २८) सकाळी साडेदहा पर्यंत जिल्ह्यात सरासरी १९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे रखडलेल्या पेरणींची कामांना पुन्हा प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यामध्ये जून महिन्यात प्रारंभापासून पावसाचे प्रमाण चांगले होते. यामुळे शेतकर्‍यांनी जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पेरण्यांना प्रारंभ केला होता. परंतु यानंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणींचे संकट ओढवले होते. यंदा सोयाबीन बियाणांची टंचाई असल्यामुळे शेतकर्‍यांना अधीकचे पेसे देवून बियाणे खरेदी करावे लागले. अशातच पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.

हेही वाचा - नाशिक पोलीसांनी गुन्हेगारांना सुधारण्याची संधी दिली आणि गुन्हेगारांसाठी ती एक मोठी पर्वणीच ठरली...

दरम्यान रविवारी (ता. २७) दुपारनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली. हा पाऊस मुदखेड, धर्माबाद, भोकर, बिलोली, उमरी, हदगाव तालुक्यात अधीक होता. तर इतर सर्व तालुक्यातही पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या सर्वच भागात होत असल्याने रखडलेल्या पेरण्यासांठी शेतकरी सरसावले आहेत.

मंडळनिहाय पाऊस

नांदेड शहर मंडळात ३७, बिलोली ३५, आदमपूर व लोहगाव प्रत्येकी ३५, कुंडलवाडी ५०, कंधार ४०, हदगाव ३५, मोघाळी २८, देगलूर ३५, खानापूर व माळेगाव प्रत्येकी ३४, इस्लापूर ४२, उमरी ३५, अर्धापूर २८, शहापूर ३७. नरसी ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

येथे क्लिक करा - रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दखल घेत आपल्या ट्विटर हँडलवर संबंधितांच्या कामाचे कौतुकही केले...तरीही लोहमार्गाचा प्रश्न रेंगाळला

तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस

(मिलीमीटरमध्ये)

नांदेड १६.३, बिलोली ३५, मुखेड १२.५, कंधार १०.६, लोहा ९.६, हदगाव २१.४, भोकर २३.६, देगलूर ३४.२, किनवट २४.७, मुदखेड ६, हिमायतनगर १२.७, माहूर ६, धर्माबाद २५, उमरी २३.७, अर्धापूर २१.८, नायगाव २५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: गरिबीची थट्टा, मारहाण अन्... शाळेतच शिक्षक आणि मैत्रिणींचं विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कंटाळून मुलीचा टोकाचा निर्णय

लाल दहशतवादामुळे आदिवासींपर्यंत विकास गंगा पोहोचली नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

T20 World Cup: नेपाळच्या संघाकडून बलाढ्य इंग्लंडची दमछाक अन् शेवटच्या चेंडूवर अवघ्या ४ धावांनी थरारक विजय

Latest Marathi News Live Update : प्रगटदिनी श्री गजाननाच्या भक्तीरसात न्हाली विदर्भपंढरी

Mumbai Goa Highway Traffic : इंदापूर-माणगाव वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मनस्ताप, बाह्यवळण मार्गाचे काम खोळंबल्याने समस्या

SCROLL FOR NEXT