file photo 
नांदेड

माहूर तालुक्यात आढळला दुर्मिळ पिवळा पळस; बघ्यांची गर्दी

साजीद खान

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : रंगपंचमी जवळ आली की हमखास आठवण होते ती पळस फुलांची, भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना लाल- केशरी रंगाची भरगच्च फुले लागलेली पळसाची झाडे नजरेस पडताच निसर्ग सौंदर्याच्या घटनाक्रमाचा आकर्षण मनाला प्रसन्न करून जातं. लाल- केसरी पळस सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. मात्र माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील माळरानात दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून पिवळा पळस फुललेल्याची ही दुर्मिळ घटना चर्चेचा विषय बनली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगात जैवविविधतेने नटलेल्या माहूर तालुक्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील माळरानात नेहमी दुर्मिळ जीव व वनस्पती आढळतात. भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रस्त्याने जाताना दूरवर नजर टाकली तर आपल्याला एक झाड फुलले दिसते. केशरी, लाल व शेंद्री रंगाची भरगच्च फुले लागलेली पळसाची रान झाडे. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. वसंत ऋतू आला की, पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल- शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते. लाल- शेंद्री रंगाचे पळस सर्वत्र पाहायला मिळते झुपकेदार फुलांसाठी प्रसिद्ध हे पळस सगळ्यांच्याच परिचयाचा आहे.

मात्र माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरात दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आला आहे. या दुर्मिळ वनस्पतीला कुतूहलाने पाहले जात आहे. पिवळा पळस हा अत्यंत दुर्मीळ समजला जातो. औषधीसाठी या फुलांचा उपयोग केला जातो. पिवळ्या पळसाबद्दल एक अंधश्रद्धा अशी देखील आहे की, त्याच्या पिवळ्या फुलांचा उपयोग गुप्तधन शोधण्यासाठी केला जातो. ही जरी अंधश्रद्धा असली तरी या झाडाचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. पिवळ्या पळसाबद्दल वनस्पती शास्त्रज्ञांचे असे मत आहे. की हा सगळा अल्बिनिझमचा प्रकार आहे. यामध्ये वनस्पतीतील रंगद्रव्यात बदल होतो. ऐरवी लाल, केशरी- भगव्या रंगाचे आढळणारे पळस पिवळ्या रंगाचे आढळणे हा अलगिलिझमचाच प्रकार आहे. अतिशय दुर्मीळ व औषधीसाठी अनन्यसाधारण महत्व असणार्‍या या पिवळ्या पळसाचे संवर्धन व संरक्षण होणे आवश्यक आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत करण्यात आलेल्या जैवविविधता सर्वेक्षणात या वनस्पतीची कुठेही नोंद असल्याची माहिती नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT