file photo 
नांदेड

नांदेडला गुरु गोविंदसिंघजी प्रकाशपर्वनिमित्त मुख्य गुरूद्वारात धार्मिक सोहळा

प्रमोद चौधरी

नांदेड ः गुरु गोविंदसिंघ महाराज यांच्या प्रकाशपर्वानिमित्त तख्त सचखंड श्री हजुरु साहिब येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पूजा- पाठ, कथा, नगर किर्तनसह नेत्रदिपक आतषबाजीचेही आयोजन केल्याचे गुरुद्वारा बोर्डातर्फे कळविले आहे.

दरवर्षी गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे गुरु गोविंदसिंघ महाराज यांच्या प्रकाशपर्वानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही ता. १९ व ता. २० जानेवारी रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ता. २० जानेवारी रोजी सकाळपासूनच पूजा-अर्चा, किर्तन लंगर, फुलांची सजावट, रोशनाई, गुरुद्वारा गेट नंबर दोन आणि सचखंड परिसरात विविध संघटनांतर्फे पाच दिवस अकालगड सेवक जत्थातर्फे पूजा-पाठ, कथा, किर्तन आदी कार्यक्रम होतील. सायंकाळी चार वाजता गुरुद्वारा सचखंड गेट नंबर एक पासून नगर किर्तन पारंपारिक मार्गाने साजरा होणार असून, या दरम्यान नेत्रदीपक आतषबाजीही केली जाणार आहे.

या शिवाय ता. १९ जानेवारी रोजी रात्री नऊ ते साडेबारा या वेळेमध्ये दर्शनसिंघ लुथरा परिवार लुधियाना, संत बाबा कुंदनसिंघ भलाई ट्रस्ट यांच्या वतीने विशेष किर्तन होईल. यामध्ये दरबार साहिब अमृतसरचे रागीभाई रविंद्रसिंघ, सचखंड श्री हजुरु साहिब येथून गुरप्रतापसिंघ व तेजिंदरसिंघ, सुरजीत सिंघ, संत बाबा जोगिंदरसिंघ, मोनी धार्मित विद्यालयाचे विद्यार्थी आणि तख्त सचखंड श्री हजुरु साहिबचे मितग्रंथी गुरमीतसिंघ पुजारी सहभागी होणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्यावतीने प्रभारी अधिक्षक रणजीतसिंघ चिरागिया यांनी केले आहे.

असा आहे गुरुद्वारा

तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब नांदेडचे मुख्य गुरुद्वारा आहे आणि ते सिखांच्या अधिपत्याखालील पाच उच्च जागांपैकी एक आहेत. हे असे स्थान आहे जेथे श्री गुरु गोविंदसिंहजींनी आपला शेवटचा श्वास घेतला. नांदेड शहरात असंख्य गुरुद्वारे आहेत. मुख्य गुरुद्वाराची निर्मिती पंजाबचे महान शासक महाराज रणजितसिंहजींनी १८३० ते १८९१ दरम्यान बांधले. गुरुद्वाराच्या आत, ज्यामध्ये १० व्या गुरूंचे मर्त्य अवशेष आहेत, तेथे अनेक प्रकारचे शस्त्रेही ठेवण्यात आलेले आहेत. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT