File Photo 
नांदेड

संकल्पनात्मक चौकटीत राहून संशोधन व्हावे ः प्रा.डॉ.पवार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : माहिती विश्लेषणाच्या अभ्यास पद्धतीला आज महत्व प्राप्त झाले आहे. संशोधकाने सर्वेक्षणातून तथ्य संकलन केले तर संख्याशास्त्राच्या स्वरुपात माहिती गोळा होते. अशा संख्याशास्त्राला बोलके करणे, संख्येला भाषेत रुपांतरीत लोकांपर्यंत पोहचवणे हे संशोधकांचे काम आहे.

राज्याच्या ६० वर्षाच्या प्रवासाचे सामाजिक, अर्थिक, राजकीय व साहित्य-संस्कृती अशा विविध अंगाने मानव विद्याशाखेत संशोधन होत आहे. परंतु, हे संशोधन महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या संकल्पनात्मक चौकटीत राहुन केले गेले पाहिजे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

पीपल्स महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रामार्फत मानव्यविद्याशाखेच्या वतीने रविवारी (ता.१७) ‘संशोधन व संशोधन पध्दती’ विषयावर राज्यस्तरीय वेबीनारचे आयोजन केले होते. झुम, युट्युब व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या वेबीनारमध्ये राज्यातील विविध विद्यापीठातील ५१७ प्राध्यापक, संशोधन मार्गदर्शक, संशोधक वद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.  या वेबीनारचे उद्‍घाटन पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांच्या हस्ते झाले. 

संशोधकाला माहितीचा अर्थ लावाला लागतो

या वेळी मत मांडताना प्रा. डॉ.पवार म्हणाले, संशोधकाने संकलीत केलेली माहिती ही ज्ञानाला अर्थप्राप्त करुन देते. परंतु, संशोधकाने मिळवलेली सर्वच माहिती म्हणजे ज्ञान नव्हे; तर उपलब्ध माहितीच्या आधारे संशोधकाला माहितीचा अर्थ लावाला लागतो. संशोधक त्या उपलब्ध माहितीकडे कुठल्या दृष्टीने बघतो. माहिती संकलन व विश्लेषण कशा पद्धतीने करतो यावर संशोधनाची दिशा अवलंबुन असते.

यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्र संकल्पनेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि महाराष्ट्राचा विकास अशी विकासाची पाच आधारस्तंभ होते. स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या संकल्पनात्मक चौकटीत आपल्याला आजच्या महाराष्ट्राचे मोजमाप करता आले पाहिजे. संशोधनात संकल्पनांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे संशोधन अधिक जीवंत स्वरूपाचे, लोकांपर्यंत जाणारे व लोकांच्या समस्या सोडवणारे ठरू शकते असे प्रा. प्रवार यांनी सांगितले. तर या वेबीनारमध्ये सहभागी झालेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पोस्ट डॉक्टर फेलो प्रा. डॉ. नागनाथ बळते यांनी मात्र मराठी साहित्यात आज होणाऱ्या संशोधनाला अनन्यसाधारण महत्व असताना आणि दिर्घ परंपरा असताना व महत्वपूर्ण विषयावर संशोधन होत असले तरी, संशोधक आणि काही प्राध्यापकांचा कल हा सोपे विषय निवडण्याकडे जास्त असतो या बद्दल खंत व्यक्त केली.

यांनी परिश्रम घेतले

तत्पूर्वी दरम्यान नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे म्हणाले, कोरोनानंतरचे जग आता वेगळ्या वळणावर आहे. राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीत झालेल्या बदलांच्या अनुरूप मानव्यविद्या शाखांचा पुनर्रविचार करणे गरजेचे आहे. कोरोनानंतरच्या जगात आपल्या जगण्यात, लक्षणिय बदल करावे लागतील. याची एक झलक व नांदी म्हणजे हा वेबीनार आहे. संस्थेच्या सचिव प्रा.श्‍यामल पत्की, पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव, उपप्राचार्य डॉ. बी.डी. कोम्पलवार, डॉ. ए.एन. सध्देवाड, प्रा.डॉ. सी.के. हरनावळे, डॉ. एम.बी. मर्झा यांच्या मार्गर्दानाखाली समन्वयक डॉ. वााल पतंगे, सहसमन्वयक डॉ.पंढरी गड्डपवार व श्री.राहुल गवारे यांनी परिश्रम घेतले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT