फोटो 
नांदेड

प्लाझ्मा डोनेशनला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना आजारावर मात केलेल्या शूर कोरोना यौध्यांनी आता अत्यवस्थ कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा डोनेशन करण्यास सुरवात केली आहे. शासकीय रक्तपेढी नांदेड येथे दोन दात्यानी प्लाझ्मा दान केले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

प्लाझ्मा डोनेशनसाठी आपल्या 'साई रक्तदाता महाराष्ट्र' तर्फे करण्यात आलेल्या आवाहानास आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही खूप समाधानकारक बाब आहे.
प्लाझ्मा डोनेशन केलेल्या प्लाझ्मा दात्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच, अशी माणसं आहेत म्हणूनच समाजात माणुसकी जिवंत आहे. दोन्हीं प्लाझ्मा दात्यांच्या दातृत्वाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाजात अनेक माणसे असेही आहेत की रक्तदानसुद्धा करण्यासा मागेपुढे पहातात. कारण रक्तदान करणे म्हणजे समोरच्या एकाद्याला जीवदान देणे होय. परंतु हे पुण्याचे काम काही लोकांच्याच नशिबी असते असे म्हणतात ते खरे आहे.

कोरोनातून मक्त झालेल्या दोघांनी केले प्लाझ्मा दान

स्वतः कोरोना सारख्या आजाराचा सामना करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता स्वतः च्या जिविताची पर्वा न करता प्लाझ्मा दान करणारे दाता, कोरोना रुग्णासाठी अहोरात्र काम करणारे डॉक्टर्स, दवाखान्यातील स्टाफ, पोलीस, अत्यावश्यक सेवा देणारे सर्वजण या काळात कोरोनाग्रस्थानांसाठी राबणारे सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, रक्तदान व ईतर सामाजिक कार्यात हातभार लावणारे सर्वच जण आहेत. आणि म्हणूनच जनसंवाद साधतांना मी प्रत्येक वेळी "ईश्वर स्वरूप जनता" असा उल्लेख करत असतो. असे मत डॉ. गंगाधर घुटे यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा -  पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम ‘या’ गुरूरत्न पुरस्काराने सन्मानीत होणार
 
प्लाझ्मा देणाऱ्याचे सर्वत्र कौतुक

दिन दुखितांची मदत करण्यासाठी पुढे येणारा प्रत्येक हात हा ईश्वराचाच हात असतो. दोनही प्लाझ्मा दात्यांचे त्यांनी अभिनंदन करून माझ्या प्रत्येक कार्यात हातभार लावणाऱ्या दृश्य, अदृश्य हातांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले. प्लाझ्मा दात्यांची नावं आणि ओळख सध्या काही दिवसांसाठी गुप्त ठेवण्यात आली आहेत.

प्लाझ्माबद्दल लोकांमध्ये जागुरता निर्माण करावी 

अधिकाधिक प्लाझ्मा दात्यांना या कार्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी प्लाझ्माबद्दल लोकांमध्ये जागुरता निर्माण करावी जेणेकरून प्लाझ्मा डोनेटचे समज गैरसमज दूर होण्यास मदत होईल. तसेच प्लाझ्मा डोनेशन केल्यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नसल्याचे डॉ. घुटे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

SCROLL FOR NEXT