File Photo 
नांदेड

लय गंभीर; वाडी - तांड्यावरही कोरोनाची दस्तक

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः वाडी तांड्याला समस्या ह्या पाचवीला पूजलेल्याच. त्यात कुठून तरी कोरोना आलाय, आणि तो आपल्या भागात येइल, असे कधी कुणाला वाटले नव्हते. मात्र, कोरोनाने वाडी-तांड्याचा रस्ता धरल्याने अनेकांची झोप उडाली आहे. असेच दोन बाधित रुग्ण तांड्यावर सापडल्याने गावेही सुरक्षित राहिली नाहीत.        
 
दोन महिन्यापासून कोरोनाचे नाव ऐकून जणू नांदेडकरांना आता कोरोनाची जणू सवयच झाली आहे. रोजच काळजी आणि धडकी भरवणाऱ्या या आजाराने जिल्ह्यातील विविध भागात पाय पसरायला सुरुवात केली आहे. सोमवारी (ता.२५) पुन्हा सहा संशयितांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १३३ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
 
हेही वाचा-  Video - ताणतणाव घालवा...मेंदूचे आजार पळवा... - डॉ. संदीप देशपांडे

वाडी तांड्यावर पहिल्यांदाच दस्तक 

सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमधील दोन व्यक्ती ह्या इतवारा भागातील २७ आणि ३२ वर्षाचे दोन पुरुष असून, आनंद कॉलनी, जिजामाता कॉलनी येथील ८० वर्षाच्या एका ज्येष्ठांचादेखील यात समावेश आहे. या शिवाय माहूर तालुक्यातील वडसा तांडा आणि किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील १७ व २९ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाने वाडी तांड्यावर पहिल्यांदाच दस्तक दिली आहे. तर मित्तलनगर भागातील ५५ वर्षीय व्यक्तींचा रिपोर्च पॉझिटिव्ह आल्यानंतर काही तासातच मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता सातवर पोचली आहे. 

 ५५ वर्षीय महिलेची प्रकृती चिंताजणक

दुसरीकडे एनआरआय यात्रीनिवास येथील चार पॉझिटिव्ह रुग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील १३३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती डॉ.भोसीकर यांनी दिली. तर तितक्याच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून, यातील ५५ वर्षीय महिलेची प्रकृती चिंताजणक असल्याचे त्यांनी सांगितले. दोन रुग्णांना उपचारासाठी तातडीने मुंबई येथे पाठविण्यात आले. रविवारी घेतलेले १४५ संशयित व्यक्तींचे स्वॅबचा अहवाल संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्याता आहे. रविवारी १४३ तपासणीसाठी लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. त्या स्वॅबचा अहवाल मंगळवार सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. 


-२३७ जण निरीक्षणाखाली 
-६६ व्यक्ती रुग्णालयात क्वारंटाईन
- दोन हजार ९९४ घरी क्वारंटाईनमध्ये आहेत.
-१४३ स्वॅब अहवाल तपासणीसाठी घेतले 
-१३३ रुग्ण पॉझिटिव्ह 
-२८८ नमुने अहवाल तपासणी बाकी
- ६३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले 
-सात बाधितांचा मृत्यू 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT