nnd23sgp09.jpg 
नांदेड

उमरी तालुक्यातील रस्त्यांचे काम प्रगतीपथावर

प्रल्हाद हिवराळे


उमरी, (जि. नांदेड) ः तालुक्यातील भोकर ते लोहगाव राज्य महामार्ग क्रमांक २५१ व मुदखेड - उमरी-रामखडक मार्गे धर्माबाद राज्य महामार्ग क्रमांक २६० या दोन रस्त्याचे डाबंरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून यात छोटे- मोठे सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने यापुढे प्रवासी वाहनधारकांना होणारा त्रास कमी होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आली. 


मुदखेड ते उमरी रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाल्यासारखे आहे. तसेच भोकर ते उमरी या रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम दर्जेदार झाले आहे. तसेच उमरी ते कारेगाव फाटा याही रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कारेगाव ते लोहगाव फाटापर्यंत डाबंरीकरणाचे काम अंतीम टप्यात आले असून बांधकाम विभागाच्या देखरेखीत पूर्ण होत आहे. 

नांदेड-मुदखेड-उमरी-रामखडक मार्ग धर्माबाद हा तेलंगणाला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने सर्व वाहने याच रस्त्याने जाताना दिसत आहेत. तसेच आदिलाबाद-भोकर ते उमरी-लोहगाव नर्सी ते देगलूर-कर्नाटक मार्ग जवळचा असल्याने याही रस्त्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. उमरी शहरातील गोरठा वाय पॉईंट ते एमसीबी सब स्टेशन अंदाजे दोन किलो मीटरच्या वर हा रस्ता राहिला असून या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम केल्यास वाहतुकीसाठी सुरळीत होईल. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण करून सुधारणा करावी अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. या भागाचे आमदार राजेश पवार व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दखल घेऊन या कामाचे प्रस्ताव शासनाकडे पाठवून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेणार असल्याची माहिती देण्यात आली. येत्या पाच वर्षांत उमरी तालुक्यातील सर्वच रस्ते मजबुतीकरण व डाबंरीकरण केल्या जाईल असे आमदार राजेश पवार यांनी ‘सकाळ’शी माहिती देताना सांगितले. 

लवकरच इतरही रस्ते होणार पूर्ण
जामगाव पेट्रोल पंप ते उमरीतील मुक्कावार पेट्रोल पंप जवळ असा मधला मार्ग बायपास रस्ता मजबुतीकरण व डाबंरीकरणाच्या कामासाठी २५ कोटी रुपये व पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंजूर केले. या बायपासमुळे शहराच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांना आता दोन रेल्वे गेटचा अडथळा होणार नाही तसेच अवजड वाहनेही शहरातून जाणार नाहीत. सदर रस्ता सिमेंट कॉँक्रिटचा होणार असून काही दिवसात काम सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाकडून देण्यात आली. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT