Sahastrakund waterfall 
नांदेड

अन् सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला

पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

प्रकाश जैन

हिमायतनगर - निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे. गेल्या चार दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहताना पाहावयास मिळत आहे.

मराठवाड्यातूनच नव्हे तर तर मुंबई, पुणे, हैदराबाद यासारख्या ठिकाणाहून या पर्यटन स्थळाला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत‌. त्याचबरोबर वन विभागाने तयार केलेली निसर्गरम्य नर्सरी ही या धबधब्यांच्या सौंदर्यामध्ये भर घालताना दिसून येते. पण या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी कुठलीही लॉजिंग सारखी किंवा रिसोर्ट सारख्या सुविधा नसल्यामुळे या पर्यटन स्थळाचा पुरेपूर पर्यटकांना आनंद घेता येईना.

नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या कालावधीमध्ये या पर्यटन स्थळाच्या विकासांना चालना मिळाली होती पण त्यानंतर कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी या पर्यटन स्थळाकडे लक्ष न दिल्यामुळे या पर्यटन स्थळाचा विकास खुंटला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या पर्यटन स्थळाकडे लक्ष वेधावे अशी मागणी या भागातील जनतेतून पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT