file photo
file photo 
नांदेड

खाकिला सलाम : कुरुळ्यात शंभरी गाठलेल्या निराधार महिलेस पोलिसांचा आधार

विठ्ठल चिवडे

कुरुळा ( ता. कंधार, जिल्हा नांदेड ) : पोलिसी खाक्या म्हंटल की भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडते. अनेकांची बोबडी वळते. गुन्हेगारांसाठी तर कर्दनकाळच जणू. कधी कठोर तर कधी उग्र, प्रसंगी माणुसकी आणि ममत्वाचा ओलावाही या खाकीतून अनुभवायला मिळतो. वृद्ध निराधार महिलेस आधार देत वरुन कठोर परंतु आतून मृदू असणाऱ्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा असे खाकितील माणुसकीचे दर्शन कुरुळा येथील एका घटनेतून झाले.

सुभद्राबाई गोविंद ढवळे शंभरी संपली तरी वनवास संपला नाही. स्वतः पाणी भरण्यापासून ते स्वयंपाक, धुनी- भांडी, झाड- लोट ते गावकुसातून जळतन आणावं लागत अस सांगतात. संघर्ष पाचवीलाच पुजलेला स्वतः च्या पोटचं मूल- बाळ नसल्याने कुणाचाही आधार नाही. अशा परिस्थितीतही एका हाती काठी आणि खांद्यावर छोटा पाण्याचा हंडा खांद्यावर घेऊन थरथरल्या पायांनी घराची वाट शोधणाऱ्या सुभद्राबाईना पाहिल्यावर कुणालाही हळहळ वाटावी अशी परिस्थिती.

नेमक्या याच परिस्थितीला वरवर कडक वाटणारी पोलिसी खाकी ममत्वाने मृदू झाली आणि माय शब्दाला जागणारी कृती कुरुळा येथील पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांकडून घडली. बिट हवालदार सुभाष चोपडे यांनी स्वतः पुढाकार घेत बालाजी केंद्रे आणि होमगार्ड श्री. घुगे यांच्यासह वृद्ध सुभद्राबाई यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या घरी भेट घेऊन त्यांना नऊवारी साडी- चोळी आणि इतर जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या. ओळख नसलेल्या आणि अशी अचानक भेट दिल्याने सुभद्राबाई यांचा कंठ दाटून आला. गरज भासल्यास मला आणखी कळवा अशी विनंती चोपडे यांनी केली. यावेळी सुभद्राबाईनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

प्रसंगच एवढा भावनिक होता की, पाहताक्षणी पापण्याच्या कडा ओल्याचिंब होतील. कळत नकळत बिट हवालदार यांचे डोळे डबडबले होते. मला जगवणारे तुम्हीच माझे लेकरं आहोत. माझ्या मुखात चारा घालण्यासाठी तुम्ही आलात. मी निराधार आहे वर्षभरापासून निराधाराचे पैसे सुद्धा येत नाहीत. असे म्हणून आसवाने ओघळत्या चेहऱ्यांनी दोन्ही हात वर करुन आशीर्वाद आहे असे सुभद्राबाई म्हणाल्या. वर्दीतल्या माणसाला एका निराधाराची दर्दी कळली यापेक्षा दुसरी कोणती मोठी गोष्ट असेल. सत्याच्या रक्षणासाठी खल प्रवृत्तीचे निग्रहन करणारी खाकी एवढी प्रेमळ आणि मृदू असते हे मात्र या घटनेवरुन सिद्ध होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT