file photo 
नांदेड

माहूर तालुक्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर रेती माफियाांचा हैदोस 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : तीर्थक्षेत्र माहूर तालुक्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर रेती माफियानी हैदोस माजवलाय. सगळे नियम पायदळी तुडवत पैनगंगा नदीपात्र रेती माफियानी पोखरण्यास सुरुवात केली. बड्या राजकीय मंडळींचा या रेतीमाफियात अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात व्यस्त असल्याने रेतीमाफिया जास्तच सुसाट झाल्याचे चित्र दिसून येते.  

पैनगंगा नदी ही मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागाला विभागणारी नदी म्हणून ओळखल्या जाते. याच पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यातील बाजूने साकुर येथे रेतीचा शासकीय ठेका घेण्यात आलाय. पण सर्व नियम धब्यावर बसवत इथे रेती उपसा सुरु आहे. बोटीला परवानगी नसताना 10 बोटी सेक्शन पंप लावून बेसुमार रेतीचा उपसा केला जात आहे.

नदीपात्रात नांदेड जिल्ह्याच्या बाजूने पाणी असल्याने बोटचे पाइप इकडे टाकून नांदेड जिल्ह्यातील बाजुनेही उपसा केला जातोय. शिवाय जेसीबीने उपसा करण्याची परवानागी नसताना अनेक जेसीबीने रेती उपसा केला जातोय. सर्रास हा प्रकार सुरु असतांना प्रशासन मात्र काहीच कारवाई करत नाहीये. दररोज चार ते पाच कोटी रुपयांची रेती नदीपात्रातून काढल्या जात असून सर्वांच्या आशीर्वादाने हा उपसा सुरु असल्याचे सांगितल्या जाते.

रेती माफियांच्या या हैदोसामुळे माहूर तालुक्यातील लिंबायत गावातील ग्रामस्थांच जगणं मुश्किल बनलंय. रात्रंदिवस बोटी आणि जेसीबीच्या आवाजाने इथले ग्रामस्थ झोपू देखील शकत नाहीयेत. त्यातुन गावकऱ्यांनी तक्रार करुनही यवतमाळ आणि नांदेडचे प्रशासन मात्र कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत.

काही दिवसांपूर्वी याच रेती माफियांनी उमरखेडच्या एका नायब तहसीलदाराला जीवघेणी मारहाण केली होती. त्यातून या रेतीमाफियांची या भागात दहशत पसरलीय. अमरावती आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT