valu.jpg 
नांदेड

वाळू माफियांनी शोधून काढली नवीन शक्कल

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड)ः धर्माबाद तालुक्यातील संगम नदीपात्रातून व गोदावरी नदीपात्रातून बेसुमार चोरटी वाळू वाहतूक केली जात आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने मालिकाच प्रकाशित केल्याने उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी संगम नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक होत असलेल्या चोर रस्त्यावर जेसीबीने ठिकठिकाणी खड्डे खोदून रस्ता बंद केला. यामुळे काही दिवस चोरटी वाळू वाहतूक बंद होती. परंतु, चोरी केल्याशिवाय राहू शकत नसल्याने पुन्हा नवीन युक्ती लढवत संगम नदीपात्राजवळ पुन्हा नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. आता संगम नदीपात्रातून रात्रीच्या वेळी पुन्हा चोरटी वाळू वाहतूक टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे जोमाने सुरू झाली असून एक प्रकारे वाळू माफियांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांना आव्हानच दिले आहे.

येथून जवळच असलेल्या धर्माबाद तालुक्यातील संगम नदीपात्रातील टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे बेसुमार चोरटी वाळू वाहतूक धर्माबादेत सुरू होती. या बाबत ‘सकाळ’मधून मालिका प्रसिद्ध होताच नदीपात्राजवळील सर्व चोर रस्ते बंद करण्यात आले आहे. संगम येथील नदीपात्र व गोदावरी नदीपात्रातील वाळूचा लिलाव झालेला नाही. असे असतांना नदी पात्रातील वाळूकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीसह पोलिस पाटील यांची होती. तसेच संबंधित तलाठी यांचीही आहे. परंतु, गेल्या दोन - तीन महिन्यांपासून रात्रीच्या वेळी टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे सर्रास बेसुमार चोरटी वाळू वाहतूक केली जात होती. 


कोट्यवधी रुपयांच्या महसूल बुडविल्या जातोय
सद्यःस्थितीत हजारो ब्रास वाळू चोरली गेली असावी. अवैध वाळू वाहतुकी बाबत ‘सकाळ’ने मालिका प्रकाशीत केली होती. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दत्तात्रय शिंदे, तलाठी आंबेराय यांनी नदीपात्राला भेट दिली. नदीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी करून सर्व चोर रस्ते जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राजवळ ठिकठिकाणी खड्डे खोदून बंद करण्यात आले. तसेच संगम येथील एका वाळू साठ्यावर कारवाई करून वाळू जप्त करण्यात आली होती. आता वाळू माफियांनी पुन्हा नवीन युक्ती लढवत संगम नदीपात्राजवळ पुन्हा नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. आता संगम नदीपात्रातून रात्रीच्या वेळी पुन्हा चोरटी वाळू वाहतूक टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे प्रशासनाला न जुमानता सर्रासपणे जोमाने सुरू झाली असून एक प्रकारे वाळू माफियांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांना आव्हानच दिले आहे. सदरील भागात कुठल्याही प्रकारचा वाळू लिलाव झालेला नसतानाही अवैधरीत्या बेसुमार वाळू उपसा करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसूल बुडविल्या जात आहे.

महसूलची यंत्रणा कार्यान्वित नाही
तालुक्यातील संगम व गोदावरी नदीपात्रात वाळू माफियांनी पुन्हा बेसुमार वाळू उपसा करून सर्रास चोरटी अवैध वाळू वाहतूक सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी वाळू चोरीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने तलाठी, मंडळ अधिकारी यांचे पथक नियुक्ती केले आहे. परंतु, महसूल यंत्रणा कार्यान्वित नसल्यासारखेच चित्र आहे. यामुळे वाळू माफियांचा नदीपात्रात व रस्त्यावर रात्रीला पुन्हा उजेड सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT