hyva truck sakal
नांदेड

Dharmabad News : वाळूमाफियांच्या दादागिरीला ‘अभय’! पोलिसांच्या ताब्यातील हायवा दिवसाढवळ्या पळविला

पोलिसांच्या स्वाधीन केलेला आणि तहसीलसमोर उभा केलेला वाळूचा हायवा वाळूमाफियांनी बनावट चावी बनवून ३ जून रोजी दिवसाढवळ्या पळवून नेला.

सकाळ वृत्तसेवा

धर्माबाद - पोलिसांच्या स्वाधीन केलेला आणि तहसीलसमोर उभा केलेला वाळूचा हायवा वाळूमाफियांनी बनावट चावी बनवून ३ जून रोजी दिवसाढवळ्या पळवून नेला. यानंतर धर्माबाद पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल झाला खरा पण मुख्य मालकाला ‘अभय’ दिल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

धर्माबादेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूची तस्करी दिवसरात्र होत आहे. दररोज धर्माबाद मार्ग तेलंगणात वाळूची निर्यात होत आहे. पण धर्माबादवासीयांना वाळू मिळत नसल्याने संतापून सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाटील जुन्नीकर, गणेश गिरी यांनी बेकायदेशीर वाळूने भरून जात असलेला हायवा (क्र. एमएच २१ बीएच ५७१०) हा २ जून रोजी रात्री आठ वाजता रेल्वे गेट क्रंमाक दोन जवळ पकडला. पोलिसांना संपर्क केला असता सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधवार यांनी घटनास्थळी आले.

तेव्हा हायवा जाधवार यांच्या स्वाधीन केले. जाधवार यांनी सदरील हायवा तहसील समोर लावून हायवाची चावी काढून घेतली, हायवावर देखरेख ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला. रात्रभर हायवा तहसील समोर होता. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास कोणी नसल्याचे संधी साधून, कोणाला न विचारता, डुप्लिकेट चावी बनवून तहसील समोर वाळूने भरलेला हायवा वाळू माफियाने पळविल्याने खळबळ उडाली आहे.

चालकावर गुन्हा दाखल

यावर धर्माबाद पोलिस ठाण्यात आरोपी चालक रमेश बापूराव पवार (रा. उमरा, ता. लोहा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून मुख्य मालकावर ही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेली हायवा, तहसील समोरून पळवून नेऊन वाळू माफियांनी पोलिसांना आव्हान केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 2 दिवसांत सोनं 57,100 रुपयांनी महागलं! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Pune Nashik Railway: मोठा निर्णय! पुणे-नाशिक रेल्वेच्या मूळ मार्गासाठी काकोडकर समिती; दोन महिन्यांत अहवाल

Amba Ghat Traffic Update : आंबाघाटातून 900 ट्रकची वाहतूक ठप्प! अवजड वाहनांना बंदी; बॉक्साईट, साखर, कोळसा वाहतुकीवर परिणाम, पाहा काय आहे पर्यायी मार्ग?

Marathi News Live Updates : मेटाचा केजरीवालांना दणका, इन्स्टा अकाउंट केलं बंद; केजरीवाल म्हणाले, PM मोदींसमोर इतकं झुकू नका

NEET Paper: दहावीत ९२ टक्के, अकरावीपासून नीटची तयारी, पेपरफुटीनंतर लेकानं आयुष्य संपवलं; इतरांवर अशी वेळ येऊ नये, आईने घेतली दीपकेंची भेट

SCROLL FOR NEXT