नांदेड : स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलसच्यावतीने (ता.मंठा जि.जालना) विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठीही अनेकविध संस्कारक्षम शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षी करोनो संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी मराठवाडास्तरीय विभागीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा नि:शुल्क राहिल. स्पर्धा मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठीच मर्यादित राहिल, कथाकथनासाठी मराठी भाषेतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड आवश्यक आहे. कथा आठ ते दहा मिनिटांची असावी. कथाकथनाचा व्हिडिओ शांत वातावरणात तयार करावा. कथेचे नाव सांगून कथाकथनास सुरुवात करावी. (स्वत:चा नामोल्लेख करू नये). स्पर्धेतील विभागीय पातळीवरील विजेत्यांना रोख पारितोषिके तसेच प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
हेही वाचलेच पाहिजे - अर्धापूर तालुक्यात प्रारूप मतदार याद्यांनी केली पती - पत्नीची ताटातूट
१५ डिसेंबरपर्यंत व्हिडिओ पाठवावा
सहभागी शिक्षकांचा कथाकथनाचा व्हिडिओ मंगळवार,ता १५ डिसेंबर २०२० पर्यंत स्वीकारण्यात येईल. त्यानंतर आलेल्या व्हिडिओचा स्पर्धेत समावेश केला जाणार नाही. स्पर्धेचा निकाल २४ डिसेंबर रोजी साने गुरुजी जयंतीदिनी घोषित करण्यात येणार असून रीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. इच्छुक स्पर्धकांनी https:/forms.gle/JRR6Qe3dQGyk4BQb7 या लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. कथाकथनाचा व्हिडिओ नांदेड जिल्हा संयोजक व्यंकटेश चौधरी यांच्या (९४०५८२१९०००) या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा.
येथे क्लिक कराच - नांदेड : ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याचा ‘फेस्कॉम’चा संकल्प
कथाकथनातून विचारांचे बीजारोपण होणार
जिल्हा स्तरावर उत्कृष्ट दोन कथाकथन विभागीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे. शिक्षकांतील कलागुणांद्वारे होणऱ्या कथाकथनातून निश्चितच संस्कारक्षम विचारांचे बीजारोपण होणार आहे. अशी खात्री बाळगून, शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संयोजक व्यंकटेश चौधरी आणि समन्वयक पद्माकर कुलकर्णी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.