Sanjay Raut attack on Narendra Modi Amit Shah esakal
नांदेड

Sanjay Raut : 'मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपणार नाही'

बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपणार नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेवरच नांदेडकरांनी प्रेम केले म्हणूनच एवढे आमदार आणि खासदार निवडून आले.

सकाळ डिजिटल टीम

गद्दारांची प्रत्येक गोष्ट न्यायालयाने उडवून लावली आहे. एकनाथ शिंदे यांची निवडही बेकायदा आहे.

नांदेड : कागदावर निकाल लागत नाही तर जनता देईल. सध्या लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे निवडणुका घ्या मग बघा. शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. येत्या सष्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल आणि सरकारचाही निकाल लागेल, अशा शब्दात शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधांवर हल्लाबोल केला.

शिवसेना (ठाकरे) गटाच्या वतीने वामनराव पावडे मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्‍घाटन खासदार राऊत (Sanjay Raut) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख बबन थोरात, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, बबन बारसे, माधव पावडे, प्रकाश मारावार, माजी आमदार रोहीदास चव्हाण, उपसभापती भुजंग पाटील डक आदी उपस्थित होते. यावेळी संपर्कप्रमुख थोरात, माजी खासदार वानखेडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.

त्यानंतर खासदार राऊत यांनी मार्गदर्शन केले. खासदार राऊत यांनी नांदेडच्या शिवसेनेतील आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपणार नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेवरच नांदेडकरांनी प्रेम केले म्हणूनच एवढे आमदार आणि खासदार निवडून आले. मोदी आणि शहाच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.

राऊत म्हणाले की, भाजपच्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. मात्र, ते स्वतः वकील आहेत त्यांनी वकीलीही केली आहे. गद्दारांची प्रत्येक गोष्ट न्यायालयाने उडवून लावली आहे. एकनाथ शिंदे यांची निवडही बेकायदा आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. सष्टेंबर, आॅक्टोबर शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल आणि सरकारचाही निकाल लागेल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT