पाणी प्रश्न मिटला 
नांदेड

नांदेडच्या सरपंच महिलेचा आदर्श; सोडवला स्व: खर्चाने गावचा पाणीप्रश्न

हिंदोळा (ता. लोहा) येथील महिला सरपंचाने स्व: खर्चाने गावचा पाणी प्रश्न सोडवत घरोघरी नळजोडणी देत नळाव्दारे पाणी पुरवठा सुरु असून नागरिक पाणी भरतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.

गणेश ढेपे

मारतळा (जिल्हा नांदेड) : गावात कुठलीही सार्वजनिक पाणी पुरवठा योजना नसल्याने, उन्हाळ्यात पाणी टंचाई ही ठरलेली असे. हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट पाहुन महिला सरपंचाने पुढाकार घेतला. शासनाकडून कोरोना काळात पाणी टंचाई उपाययोजनेसाठी निधी केव्हा मिळेल याची वाट न पहाता स्व: खर्चाने पाणी टंचाई दुर करत पाणी प्रश्न सोडवून ग्रामस्थांना दिलासा दिला. ऐन टंचाईत मोफत पाणी पुरवठा करुन सामाजिक दातृत्वातून इतरापुढे एक आदर्श ठेवला आहे. पाण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल महिला सरपंचाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

लोहा तालुक्यातील हिंदोळा- करमाळा ही गट ग्रामपंचायत आहे. गावात ७५ चे ८० च्या जवळपास उमरे ( घर ) असून छोटेसे खेडेगाव आहे. मात्र गावात सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी कुठलीच योजना नसल्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई ठरलेली असते. हंडाभर पाण्यासाठी महिलांसह अबाल वृध्दांना पायपीट करावी लागत असे. मात्र सधन नागरिक खासगी बोअरवेल मालकांकडून वार्षिक तीन ते पाच हजार कुटूंबातील संख्येनुसार रक्कम देऊन पाणी विकत घेत होते. परंतु जनसामान्य नागरिकांची टंचाईत परवड पाहून दिलेल्या आश्वासनाला जागत पाणी प्रश्नाला प्राधान्य दिले. सरपंच पद्मीणबाई जाधव व त्यांचा मुलगा सोपान पाटील जाधव यांनी पुढाकार घेतला. गावाशेजारी असलेल्या आपल्या शेतात बोअरवेलमधून पाईपलाईन टाकुन गावात घरोघरी मोफत नळजोडणी देऊन स्व: खर्चाने पाणी प्रश्न सोडवत गावक-यांची तहाण भागवली.

हेही वाचा - नांदेडच्या कोविड सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनाविना केले कार्यमुक्त

महिलांना हंडाभर पाण्यासाठी टंचाईत भटकंती करावी लागत होती. ती थांबविण्यासाठी कांही तरी केल पाहिजे म्हणून मी पुढाकार घेतला. आणि पाणी पाजण्यासारखे दुसरे मोठे पुण्य नाही म्हणत पदरमोड करुन गावचा पाणी प्रश्न सोडवत आहे. महिला भगिणीसाठी कांही करता आले यांचा मला मनस्वी आनंद आहे.

- पद्मीणबाई जाधव, सरपंच, हिंदोळा- करमाळा

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT