नांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२ रुग्ण कोरोनामुक्त, तर सहा कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता.३०) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शनिवारी (ता.३१) ७०१ जणांचे अहवाल प्राप्त झाले, यामध्ये ६४४ निगेटिव्ह, ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ हजार ११९ इतकी झाली आहे.
एकाच वेळी पाच कोरोना बाधितांचा मृत्यू
शनिवारी दिवसभरात विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील कंधार तालुक्यातील शिराढोण येथील पुरुष (वय ७१) यासह पाच खासगी रुग्णालयातील दत्तनगर नांदेड पुरुष (वय ७५), हिमायतनगर टेभूर्णी पुरुष (वय ३१), नांदेड सांगवी पुरुष (वय ३९), भोकर प्रफुल्लनगर पुरुष (वय ५८), शिवरायनगर तरोडा (बु.) नांदेड येथील पुरुष (वय ८१) अशा सहा कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असताना आतापर्यंत जिल्ह्यातील ५१३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड सेंटर मध्ये एकाच वेळी पाच कोरोना बाधितांचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात सर्वाधिक मृत्यू झाले असल्याची आकडेवारी दिसून येते.
शनिवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील- एक, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- पाच, एनआरआय भवन व गृहविलगिकरण कक्षातील मिळून ८१, लोहा- पाच, देगलूर- तीन, मुखेड- एक, किनवट-दोन आणि खासगी रुग्णालयातील - १३ असे मिळून ११२ कोरोनाबाधित रुग्ण आजारातून मुक्त झाले आहेत.
शुक्रवारी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर व ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे घेण्यात आलेल्या स्वॅबद्वारे शनिवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात २८, नांदेड ग्रामीण- तीन, देगलूर- एक, लोहा-दोन, मुखेड- तीन, अर्धापूर-सहा, हदगाव- तीन, मुदखेड- एक, भोकर- दोन आणि किनवट- एक असे ४९ बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ हजार ११९ वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी १७ हजार ९३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५१३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५२५ कोरोना बाधितावर उपचार सुरू आहेत. त्यामधील ३६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
कोरोना मीटर
आज पॉझिटिव्ह- ४९
आज कोरोनामुक्त- ११२
आज मृत्यू- सहा
एकूण कोरोना पॉझिटिव्ह- १९ हजार ११९
एकूण कोरोनामुक्त- १७ हजार ९३४
सध्या उपचार सुरु- ५५२
एकूण मृत्यू- ५१३
गंभीर रुग्ण- ३६
स्वॅब अहवाल प्रतिक्षेत- ३६३
संपादन - स्वप्निल गयकवाड
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.