फोटो 
नांदेड

सत्याग्रह : नांदेडच्या गोदावरी काठी वाळू माफियांच्या विरोधात सत्याग्रह 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाची संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी ता. २३ मार्चपासून देशभरात लाॅकडाउन सुरू असताना विष्णूपुरी प्रकल्पाच्या बुडीतक्षेत्रात बेसुमार अवैद्य रेती उपसा, वाहतुक करण्यात येत आहे. गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा बंद करून रेती माफियांसह प्रशासनातील दोषींवर आपत्ती  व्यवस्थापन कायद्यान्वये कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमेश्वर येथे नदी काठी आनंदा बोकारे,  सदाशिव कौसे यांनी ता. १९ जूनपासून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. निष्क्रियतेवर पांघरुन  घालण्यासाठी प्रशासनाने आंदोलनाकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.
 
लाॅकडाउन कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडण्यास प्रतिबंध असताना विष्णूपुरी प्रकल्पाच्या बुडीत  क्षेत्रात बाहेरगावच्या मजूरांसह यंत्राद्वारे बेसूमार रेती उपसा करण्यात आला. तो आजतागायत सुरू आहे  . स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे सुरक्षेच्या दृष्टीने अवैध रेती उपसा, वाहतुकीबाबत तक्रारी  दिल्या. पण कोरोना महामारीला कमाईची संधी समजणाऱ्या महसूल प्रशासनाने चिरीमिरीसाठी वाळू  माफियांशी साटेलोट करुन नागरिकांच्या तक्रारीला बगल दिली. तक्रारींची आवक वाढल्याने महसूल  पथक कारवाईसाठी तहसीलमधून बाहेर पडण्यापूर्वीच मर्जीतल्या रेती माफियांना खबर देण्यात येते.

वाहतुकीमुळे सोमेश्वर गावांतर्गत रस्त्यावर धुळीचे लोट 

त्यामुळे बडेजावपनात कारवाईसाठी नदीपात्रात दाखल झालेले आधिकारी, कर्मचारी मजूरांवर छापा मारून करवाईचा आव आणत आहेत. नदीपात्रातून दिवस रात्र यंत्राच्या साह्याने रेती उपसा करून हायवाद्वारे  सर्रास वाहतूक करण्यात आली. जड वाहनाच्या वाहतुकीमुळे सोमेश्वर गावांतर्गत रस्त्यावर धुळीचे लोट उडत असल्यामुळे दलित वस्तीतील नागरिकांनी तलाठी श्री. वांगीकर यांना जाब विचारला. पण अवैध  वाळू उपशासह वाहतुकीवर तसुभरही परिणाम झाला नाही. विष्णुपुरी प्रकल्पाचा पाणीसाठा वाढत असतानाही विष्णुपुरीपासुन अंतेश्वरपर्यंत नदीपात्रात प्रशासनाच्या मुकसंमतीने बेसूमार रेती उपसा सुरू  आहे. 

 सोमेश्वर येथील नदीकाठावर सत्याग्रह आंदोलन सुरू


लाॅकडाउनचा गैरफायदा घेऊन नदिपात्रात अवैध बेसूमार रेती उपस्याप्रकरणी प्रशासनातील दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करून रेती माफियांवर कठोर कारवाई करण्यासह ईतर मागण्यांसाठी आनंदा बोकारे, सदाशिव कौसे यांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करत  सोमेश्वर येथील नदीकाठावर सत्याग्रह आंदोलन सुरू केले . मात्र प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांकडे  पुरते दुर्लक्ष करत निष्क्रियतेचे प्रदर्शन केले. याशिवाय आम्ही किती साजूक हे दाखवण्यासाठी कारवाईच्या नावाखाली पथकाची मात्र नदीपात्रातून बोट सवारी होते या पेक्षा चार दोन ताफ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो.

पोलिस प्रशासनाला गांभीर्य  नाही
 
अवैद्य रेती उपासा, वाहतुकीच्या प्रकरणामध्ये राज्यात जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यापर्यंतच्या अनेक  अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागल्याच्या अनेक घटना आहेत. रेती  माफियाप्रसंगी कोणत्या थराला जातात हे नव्याने सांगण्याची गरज नसताना लिंबगाव पोलिस मात्र गेल्या  चौदा दिवसात आंदोलनाकडे साधे फिरकलेही नाहीत हे विशेष. 

अन्यथा तिव्र आंदोलन 

विष्णुपुरी ते अंतेश्वरपर्यंत नदीपात्रातील अवैद्य वाळू उपसाप्रकरणी नदीपात्राचे मुल्यांकन करुन वाळूची  वसुली करण्यात यावी. ठिकठिकाणचे वाळू साठे जप्त करून घरकुल लाभार्थींना मोफत वाटप करण्यात  यावेत. दोषी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करून वाळू माफियांना कठोर शासन करावे  अन्यथा कार्यालयीन वेळेत सत्याग्रह आंदोलन लवकरच बेमुदत उपोषणामध्ये प्रवतर्तीत करण्याचा  ईशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT