गावरान आंबा, हदगाव 
नांदेड

'गावरान आंबा वाचवा मोहीम'; राजकुमार रणवीर यांच्या संकल्पनेला प्रतिसाद

मराठवाड्यात नामवंत गावरान आंब्याची झाडी होती. अनेक गावात आमराई नावाने प्रसिद्ध असलेल्या या भागात आंब्याचा हंगाम सुरु झाला की, सर्व गावच आंबे खात असत.

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : निसर्गाची अनमोल देणं लाभलेला गावरान आंबा सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा ठेवा एकदा संपला तर पुन्हा मिळणार नाहीत. यासाठी गावरान आंबा लाववड वाढविण्यासाठी हदगाव तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांनी गावरान आंबा वाचवा मोहीम होती घेतली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठवाड्यात नामवंत गावरान आंब्याची झाडी होती. अनेक गावात आमराई नावाने प्रसिद्ध असलेल्या या भागात आंब्याचा हंगाम सुरु झाला कि, सर्व गावच आंबे खात असत. परंतु काळाच्या ओघात अनेक ठिकाणची आमराई नाहीशी झाली. आज तर गावरान आंब्याचे झाड शोधूनही सापडत नाही. यामुळे बाजारातून हा आंबा लुप्त झाला आहे. परिणामी नव्या पिठीला या आंब्यापासून वंचीत राहावे लागत आहे.

हेही वाचा - केंद्रातील सरकार हेच जनतेचे सरकार- प्रताप पाटील चिखलीकर

नामशेष होणार्‍या गावराण आंब्याला रिकाम्या, पडीत जागेत, शेतात त्याची लागवड करता येते. निर्जीव जागेला जिवंत करायचे असेल तर गावरान आंबा

लावावा, त्यावर जेव्हा पक्षी, मधमाशा येतील मनाला शांती मिळेल, असे त्यांनी सांगीतले. गावरान आंबे बाजारातून आनल्यानंतर शिल्लक कोयीची लागवड रिकाम्या जागेत करावी. झाडाला रोज पाणी देण्याचे काम लहान मुलाला दिले तर ते आतिशय आवडीने करील. गावरान आंब्याचे झाड सलग ६० ते ७० वर्ष शुद्ध हवा, सावली, पक्षांना निवारा, मध माशांना आसरा, घराच्या सौंदर्यात भर आणी मधूर रस मिळेल.

घरापासून केली सूरवात

राजकुमार रणवीर यांनी गावरान आंबा वाचवा मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी हे काम आपल्या घरापासून सूरवात केली आहे. घरी लावलेल्या गावरान आंब्याची चव इतरांनाही मिळावी, यासाठी त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून गावरान आंब्याचे महत्व, त्याची चव, पर्यावरणाचे संरक्षण आदीबाबत महत्व पटवून देत सुरु केलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले.

येथे क्लिक करा - महाविकास आघाडीत अद्यापही एकजिनसीपणा आलेला नाही. आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपलाच अजेंडा आणि भूमिका राबवायच्या आहेत.

गावरान आंबा वाचवा मोहिम

गावरान आंबा वाचवा मोहिमेत अधिकारी- कर्मचार्‍यांसह मित्रमंडळींना समाज माध्यमातून जोडले आहे. ज्यांना आंबा लागवड करायचा आहे, त्यांना कोयी उपलब्ध करुन दिल्या जातील. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यंदा किमान पाच हजार गावरान आंब्यांच्या झाडाची लागवड होईल, असा विश्‍वास आहे.

- राजकुमार रणवीर, तालुका कृषी अधिकारी, हदगाव.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: गरिबीची थट्टा, मारहाण अन्... शाळेतच शिक्षक आणि मैत्रिणींचं विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कंटाळून मुलीचा टोकाचा निर्णय

लाल दहशतवादामुळे आदिवासींपर्यंत विकास गंगा पोहोचली नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

T20 World Cup: नेपाळच्या संघाकडून बलाढ्य इंग्लंडची दमछाक अन् शेवटच्या चेंडूवर अवघ्या ४ धावांनी थरारक विजय

Latest Marathi News Live Update : प्रगटदिनी श्री गजाननाच्या भक्तीरसात न्हाली विदर्भपंढरी

Mumbai Goa Highway Traffic : इंदापूर-माणगाव वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मनस्ताप, बाह्यवळण मार्गाचे काम खोळंबल्याने समस्या

SCROLL FOR NEXT