file photo 
नांदेड

...म्हणे एन-95 मास्क हानिकारक ! केंद्राला साक्षात्कार- माजी मंत्री डी. पी. सावंत

प्रल्हाद कांबळे

नांदेड : केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानेच शिक्कामोर्तब केल्यानंतर व्हॉल्व्ह असलेले एन-९५ या  मास्कचा सर्वत्र व्यापक प्रमाणात वापर होऊ लागला. पण कोरोना रुग्णांची संख्या एक नव्हे १०० नव्हे आणि हजारावरही नव्हे तर तब्बल १० लाखांच्या वर आकडा पोहचल्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला अचानक जाग आली आहे. आरोग्य मंत्रालयाला आता हा एन-९५ मास्क आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या संशोधन, प्रयोग व विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, असे मत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
 
प्रसिद्धीपत्रकात माजी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी म्हटले आहे की, देशात कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून    सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याचे केंद्र सरकारने आवाहन केले होते. त्यानंतर अनेक प्रकारचे मास्क बाजारात आले होते. त्यातील काही मास्क   घरच्या घरीच करण्यासारखेही होते. आणि ते वापरण्यातही येत होते. पण केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने व्हॉल्व्ह असलेला एन-९५ मास्क हा अतिशय सुरक्षित असून त्याचा प्राधान्याने वापर करण्याचे निर्देश काढले होते. त्यानुसार शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात एन-९५ मास्कची मागणी नोंदविण्यात आली. या मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याने वैद्यकीय व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांनी बाजारपेठेतून दिडशे ते अडीचशे रुपये मोजून एन-९५ ब्रँड असलेले मास्क वापरण्यास सुरुवात केली. यातून करोडो रुपयांचा व्यवहार झाले. पण जीवाची सुरक्षितता हाच निकष असल्याने सर्वांनी एन-९५ मास्कला अधिक प्राधान्य दिले.

आरोग्य मंत्रालयानेच सुरवातीला एन-९५ मास्कचे गुणगान गायिले

पण कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यात एन-९५ मास्क अयशस्वी ठरत आहे. तसेच कोव्हिड-19 विरोधात सुरू असलेल्या लढाईत हे मास्क हानिकारक असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले. या मास्कचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले.  
एन-९५ मास्कवरून अचानक घेतलेल्या ‘यु-टर्न’मुळे आरोग्य मंत्रालयांतर्गत येणार्‍या विविध संशोधन संस्थांची विश्वासार्हताच उरली नाही, असे माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयानेच सुरवातीला एन-९५ मास्कचे गुणगान गायिले होते. 

मास्क हानिकारक असल्याचा अचानक कसा काय साक्षात्कार 

देशातील तब्बल १० लाखावर रुग्ण बाधित झाल्यानंतर सरकारला हे मास्क हानिकारक असल्याचा अचानक कसा काय साक्षात्कार झाला. या षडयंत्रामागे विशिष्ट कंपन्याची मार्केटिंग तर सरकारने केली नाही ना ? चार- चार महिने प्रयोग, संशोधन करुन आपले निर्णय मागे घेण्याची वेळ आरोग्य मंत्रालयावर येत असेल तर या संशोधन संस्था नेमके काय संशोधन करत आहेत, याची माहितीही सरकारने सर्वसामान्यांना दिली पाहिजे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी केंद्र सरकार खेळत असल्याच्या आरोपही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT