gas sakal media
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शाळा होणार चूल अन् धूरमुक्त

पोषण आहार शिजविण्यासाठी तीन हजार ७३९ शाळांना मिळणार सिलिंडर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील शाळेत पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्यासाठी गॅस सिलिंडर मिळणार असल्याचा शासन निर्णय शिक्षण विभागात नुकताच प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दोन हजार ९९१ शाळा धुरमुक्त होणार आहेत. (Gas Cylinder For Schools Health Food)

केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या प्रती दिन विद्यार्थीदरानुसार निधी उपलब्ध करून दिला जातो. केंद्र शासनाच्या शिल्लक निधीतून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र तीन हजार ७३९ शाळांपैकी केंद्रीय स्वयंपाक गृहामार्फत आहार पुरविण्यात येणाऱ्या शाळा व सद्यस्थितीत गॅस कनेक्शन उपलब्ध असलेल्या शाळा वगळून दोन हजार ९९१ शाळांना गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे.

प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने शाळा चूल व धूरमुक्त करण्याचे धोरण असल्याने जिल्ह्यातील दोन हजार ९९१ शाळांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे. शाळेत चुलीवर स्वयंपाक तयार करण्यात येत असल्याने ही बाब लक्षात आल्यानंतर आता शासनाने गॅस सिलिंडर नसलेल्या शाळांची यादी शिक्षण विभागाकडून मागितली आहे.

सात वर्षांपूर्वीच आखली होती योजना

शासनाने चूल-धूरमुक्त अभियान राबवित शाळांना गॅस, सिलिंडर देण्याची योजना सुमारे सात वर्षांपूर्वी आखली होती. परंतु, अनेक शाळांना याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आजही चुलीवर स्वयंपाक तयार करण्यात येतो. आता शासनाने गॅस, सिलिंडर नसलेल्या शाळांची यादी मागविली असून त्यांना गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा लवकरच चूल-धूरमुक्त होणार आहे.

जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजना सुरु असलेल्या दोन हजार ९९१ शाळांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाकूड व अन्य इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी होईल. शाळा चूल आणि धूरमुक्त होतील. येत्याकाही दिवसात शाळांना गॅस, सिलिंडर पुरवण्याबाबत कारवाई होईल.

- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Pune Weather : पुणेकरांना मोठा दिलासा! सलग तीन दिवस पावसाची उघडीप कायम; मात्र तापमानाचा पारा ३० अंशावर

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Maharashtra Rains: जुन्या पिढीपेक्षा आताची पिढी जास्त पावसाळे पाहतेय.. लांबलेल्या पावसामुळे सोशल मीडियावर मनोरंजक कॉमेंट्सची बससात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

SCROLL FOR NEXT