file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात दुसऱ्यांदा वाळू घाटांचा लिलाव; प्रतिसादाची अपेक्षा 

अभय कुळकजाईकर

नांदेड - नवीन वर्षात जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव होईल, अशी अपेक्षा होती मात्र जानेवारी महिन्यात वाळू घाटांच्या लिलावास थंडा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये फक्त एकाच घाटाचा लिलाव झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा दुसऱ्यांना वाळू घाटाचा लिलाव जाहीर केला असून आता कंत्राटदारांकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे. दुसरीकडे अजूनही वाळू माफियांकडून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वाळूची चोरी सुरूच आहे. 

नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी धडक मोहिम राबवून कठोर कारवाई केली. तरी देखील अजूनही वाळू माफियांकडून वाळूचा उपसा सुरू आहे. जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी आदी नद्यांच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा होत आहे. त्यासाठी परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या मजुरांचाही उपयोग करून घेण्यात येत होता. या सगळ्यांवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात आली. 

सातत्याने कारवाई सुरू
जिल्ह्यात वाळू घाटांवर ट्रक, टिप्पर, हायवा, ट्रक्टर आदींच्या मार्फत वाळू उपसा होऊ नये व अवैधरित्या होणारा वाळूचा उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कलम १४४ लागू केले होते. त्यामुळे काही काळ त्यावर नियंत्रण आले होते. त्याचबरोबर महसूलसोबत पोलिस, आरटीओ यांचे पथक देऊन कारवाई करण्यात आली. बोटी व वाहने जप्त करण्यात आली. तराफे जाळण्यात आले. तरी देखील दोन चार दिवसांनी पुन्हा काही ठिकाणी अवैध वाळूचा उपसा सुरू झाला आहे. दरम्यान, शनिवारी (ता. सहा) देखील महसूलच्या पथकाने कारवाई केली. 

दुसऱ्यांना वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया 
दरम्यान, जिल्हा प्रशासनाला पर्यावरण विभागाची अनुमती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील ३२ वाळू घाटांसाठी जानेवारी महिन्यात आॅनलाइन निविदा आणि ई आॅक्शन जाहीर केली. त्यात देगलूर, बिलोली आणि माहूर तालुक्यातील वाळू घाटांचा समावेश होता. त्यासाठी ता. दोन ते ता. १७ जानेवारी असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. टेक्निकल बीड ओपनिंग, प्री बीड ओपनिंग आणि इ आॅक्शन यासाठी वेळ ठरवून देण्यात आला होता. मात्र, त्यास थंड प्रतिसाद मिळाला. फक्त माहूर तालुक्यातील एक वाळूघाटाचा लिलाव त्यातून झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. 

प्रतिसादाची अपेक्षा
जिल्हा प्रशासनाने आता पुन्हा वाळू लिलावाची दुसरी फेरी जाहीर केली आहे. त्यामध्ये आता ३१ वाळूघाटाचे ई निविदा आणि ई आॅक्शनद्वारे लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी ता. २४ जानेवारी ते ता. दोन फेब्रुवारी या दरम्यान वेळ देण्यात आली होती. टेक्निकल बीड ओपनिंग आणि ई आॅक्शन प्रक्रिया पार पडणार आहे. आता यासाठी कसा प्रतिसाद मिळतो, याची माहिती येत्या दोन दिवसात कळणार आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT