file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात दुसरा पोलिस बाधीत, हदगावमध्ये पहिला रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यतील बारड (त.मुदखेड) येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील पोलिस दलातील हा दुसरा कर्मचारी आहे. तर हदगावमध्ये नव्याने पहिल्यांदा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. कोरोना आजारातून पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दोन बाधित व्यक्ती आज बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 371 बाधितांपैकी एकुण 281  व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. यातील 74 बाधित व्यक्ती हे रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 16 व्यक्तींचा इतर आजारासह कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोमवार 29 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 86 अहवालापैकी 79 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले तर त्यात 4 नवीन बाधित व्यक्ती आढळले. नवीन बाधितांमध्ये देगलूर नाका येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड नवीन कौठा येथील 53 वर्षाचा 1 पुरुष, बाफना परिसरातील 60 वर्षाची 1 महिला, मुखेड येथील 55 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.  

कोरोनाचा आलेख वाढताच

उपचार घेत असलेल्या 74 बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय 50 व 55 वर्षाच्या दोन महिला व वय  38,42,67 व 75  वर्षाचे चार  बाधित पुरुषांचा यात समावेश आहे.

पावणेतिनशे बाधीत

नांदेड जिल्ह्यात 74  बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 20, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 44 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 7 बाधित  औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले. सोमवार 29 जून रोजी 117  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 681,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 335,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 469,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 0२,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3७३,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 03,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 16,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 281,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 74
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 117 एवढी संख्या आहे.

जनतेला आवाहन

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Pune University : पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा संघटनांचा आरोप

Pune News : विना अडथळा खोदकाम करता येणार; पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT