File photo 
नांदेड

Nanded Breaking : चोवीस तासात कोरोनाचा दुसरा बळी, एकूण संख्या १६ वर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील गुलजार बाग येथील ६५ वर्षीय बाधित पुरुषाचा शुक्रवारी (ता.२६ जून) मृत्यू झाला असून, गेल्या चोवीस तासामध्ये कोरोनाचा दुसरा बळी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.  उमर कॉलनीतील ५४ वर्षीय बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता.२५) रात्री मृत्यू झाला होता.

नांदेडला गुरुवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या अहवालात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. दुसरीकडे उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी १९ रुग्णांची अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच उमर कॉलनीतील ५४ वर्षीय बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला होता. सदरील व्यक्तिचा अहवाल सात जून रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते.

शुक्रवारी सकाळी गुलजार बाग येथील ६५ वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. या रुग्णाचा अहवाल बुधवारी (ता.२४ जून) पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे सदर रुग्णावर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने या रुग्णाचा सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ वर गेली आहे.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ३६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१ अहवाल निगेटिव्ह आले असून पाच अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ३३१ इतकी झाली आहे. गुरुवाच्या अहवालात विसावानगर भागातील १७ वर्षीय युवकाचा समावेश आहे. तसेच चिखलभोसी (ता.कंधार) येथील तीन रुग्णांचा तर देगलूर येथील एका ५९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

IND vs SL: रिषभ पंत अचानक मैदानातून का बाहेर गेला? रिटायर्ड हर्ट झाल्याने रवींद्र जडेजा मैदानात आला

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीचा थरार! मार्केट यार्डमध्ये तरुणाचा खून, बिबवेवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

Marathi News Live Updates : विडी उद्योजकांकडून महाराष्ट्र सोडूण्याचा इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT