File photo 
नांदेड

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था पुन्हा कोलमडली 

प्रमोद चौधरी

नांदेड ः मागच्या वर्षी कोरोनामुळे देशोधडीला लागलेली ग्रामीण बाजारपेठ अनलॉकनंतर रुळावर आली. मात्र, राज्यात पुन्हा कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने लॉकडाउन सदृश्य परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील रोजगारांच्या अनेक पर्यायांवर निर्बंध आले आहेत. ग्रामीण भागाचा कणा असलेल्या शेतमाल विक्रीवरही त्याचा विपरित परिणाम जाणवत असल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून अनेकांच्या रोजगारावरही गदा आली आहे. 

मागील वर्षी मार्च महिन्याच्या उत्तरार्धात कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका महानगरात सुरु झाला. त्यामुळे याच मोठमोठ्या शहरातील नागरिकांनी आपल्या मूळ गावी जाणे पसंत केल्याने हळूहळू कोरोनाने ग्रामीण भागातही हातपाय पसरून कडक लॉकडाउनच्या दिशेने जाण्यास प्रशासनास भाग पाडले. कित्येक दिवस संपूर्ण राज्य टप्याटप्प्याने लॉकडाउन होत गेल्याने अनेकांच्या रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या.

मागील काही महिन्यात कोरोना रुग्णवाढीच्या दरात लक्षणीय घट दिसून आल्याने निर्बंध शिथिल करत प्रशासनानेही अनेक व्यवसायांना पूर्वपदावर आणण्यासाठी नियमात कपात केली. सगळे काही व्यवस्थित सुरुही झाले असताना गेल्या पंधरा दिवसात कोरोना रुग्णवाढीला पुन्हा सुरुवात झाल्याने मागच्या वर्षाची तीच परिस्थिती होणार की काय? अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे. 
 
लग्नसराई अर्थव्यवस्थेचा खरा कणा 
अनलॉकनंतर ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्यात लग्नसराईने खऱ्या अर्थाने पिकअप घेतला असतानाच कोरोना रुग्णवाढीमुळे लग्नातील उपस्थितींवर मर्यादा आली. परिणामी थाटामाटात होणारे लग्नसोहळे शॉर्टकट करावे लागत असल्यामुळे त्यावर आधारीत असलेले कापड दुकान, मंगल कार्यालये, बॅंड, डीजे, स्वयंपाकी, घोडे बग्गी, फोटोग्राफीसह फर्निचर दुकाने व किराणा दुकानदार अडचणीत सापडले आहेत. 

शेतमालातील तेजी थंडावली 
कडक लॉकडाउनच्या दिशेने राज्य चालले असल्याने निर्बंध कसे लागतील, याची कल्पना नसल्याने शेतमालाचे वाढत असलेले भाव सध्या स्थिर झाले आहेत. कापूस व तूर या पिकात भाववाढीचे संकेत दिसत असताना हे भाव थांबल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 
- सदानंद गोराडे, शेतकरी.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; २८ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला...

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT