Seedball planting in Ganganbeed area nanded 
नांदेड

गंगनबीड परिसरात सीडबॉलचे रोपण

हरित नांदेडसाठी जिल्हा परिषद, वन विभागाचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जिल्ह्यातील टेकड्या हरित करण्यासाठी जिल्हा परिषद व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हरित टेकडी करण्यासाठी एक व्यापक मोहीम आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सुरू करण्यात आली. या अंतर्गत नायगाव तालुक्यातील गंगनबीड परिसरातील टेकड्यांवर विद्यार्थ्यांकडून दोन हजार सिडबॉलचे रोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, वनसंरक्षक केशव वाबळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक, पालक उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संरक्षित टेकड्या, मोकळी मैदाने, रस्त्याच्या कडेलगतची मोकळी जागा या ठिकाणी सर्व शाळांच्या वतीने सीडबॉल रोपण करण्याचे कार्यक्रम आखण्यात येत आहेत.

उन्हाळी सुटी आणि शाळा आरंभी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीसाठी सीडबॉल्सची निर्मिती केली आहे. हरित टेकडी या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व टेकड्यांवर स्थानिक वृक्ष संवर्धन करण्याचा हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम आहे. वटपौर्णिमेलाही जिल्ह्यात एकाच वेळी सर्वत्र नऊ हजार वटवृक्षांचे रोपण करण्यात आले होते. हरित नांदेड करण्यासाठीचा हा एक नवीन प्रयोग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT